Shilpa Shahir: राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणी! महिलेची पहिली प्रतिक्रिया अन् शहराध्यक्ष म्हणाले, पाहणाऱ्याची नजर...

नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिवाळी मिलन कार्यक्रम पक्षाच्या कार्यालयात पार पडला. यावेळी त्या ठिकाणी पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्यानं लावणी नृत्य सादर केलं.
NCP Office Lavani Programme
NCP Office Lavani Programme
Published on
Updated on

Shilpa Shahir: नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिवाळी मिलन कार्यक्रम पक्षाच्या कार्यालयात पार पडला. यावेळी त्या ठिकाणी पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्यानं लावणी नृत्य सादर केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर टिका-टिप्पण्या सुरु झाल्या. उलट सुलट प्रतिक्रिया यायला लागल्यानंतर हे लावणी नृत्य सादर करणाऱ्या महिला कलाकारानं यावर भाष्य केलं आहे. शिल्पा शाहीर असं या महिलेचं नाव असून ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी आहे.

NCP Office Lavani Programme
Ravindra Dhangekar:"...तर राजकीय जीवनाची चिरफाड"; एकनाथ शिंदेंचा संदर्भ देत धंगेकरांनी कोणाला दिला इशारा?

लावणी कालाकाराचं स्पष्टीकरण

आपण राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स का केला हे सांगताना शिल्पा शाहीर म्हणाल्या, "मी स्वतः राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे. माझी मैत्रीण रेखाताई सरडे आणि सुनीता एरणेताई यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी मला तिथं आग्रहाची विनंती केली आणि मी तिथं पोहोचले. तिथं माझ्याबरोबर अनेक महिला होत्या. काही महिलांचा तिथं सत्कार झाला तसंच माझाही सत्कार झाला. ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं. काही पुरुषांनी देखील तिथं डान्स केला. मी लावणी आर्टिस्ट आहे त्यामुळं मी लावणीचे इव्हेंट करते. त्यामुळं मला तिथं लावणी सादर करायला लावली तर मी तिथं एक थोटीशी लावणी सादर केली"

NCP Office Lavani Programme
Top 10 News: राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणी डान्स ते मुख्यमंत्र्यांचे भाष्य अन् गोरेंच्या घोषणेमुळे अस्वस्थ मोहिते पाटील

पाहणाऱ्याची नजर कशी? हे महत्वाचं - अहिरकर

दरम्यान, या वादावर राष्ट्रवादीचे नागपूरचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, "आमच्या पक्ष कार्यालयामध्ये ज्या महिलेनं लावणी सादर केली त्या महिलेचं नाव शिल्पा शाहीर असं आहे. ही आमच्या महिला युनिटची उपाध्यक्ष आहे. या कार्यक्रमात आमच्या पक्षामध्ये जी कलाकार मंडळी आहेत त्यांनी आपापल्या कला सादर केल्या. त्यांच्यामध्ये कलागुण आहेत तर त्यांनी ते आमच्या लोकांसमोर सादर कराव्यात असा आग्रह केल्यामुळं त्यांनी नृत्य सादर केलं. तसंच लावणी हे आपल्या महाराष्ट्राचं लोकनृत्य आहे. यामध्ये वावगं असं काहीही नाही. मलाही यासंदर्भात अनेक फोन आले पण यात वावगं असं काहीच नाही. फक्त पाहणाऱ्याची नजर कशी आहे? ते महत्वाचं आहे असं मला सांगावसं वाटतंय"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com