Buldhana Lok Sabha Election : महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काही जागांवरून युतीतील मित्रपक्षांमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे युतीतील जागावाटपाचा तिढा कसा सोडवायचा, याबाबत तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातच फूट पडली की काय? अशी परिस्थित उद्भवली आहे. कारण शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी हा अर्ज शिंदे गटाची लोकसभेसाठीची यादी जाहीर होण्याआधीच भरला आहे. त्यामुळे गायकवाड बंडाच्या तयारीत आहेत की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची (Shivsena) लोकसभेसाठीची (Lok Sabha Election 2024) यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिंदे गटात नाराजीचं वातावरण निर्णाण झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे महायुतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आज गुरुवारी (28 मार्च) आमदार गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे अनेक समर्थक हजर होते. गायकवाडांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं असून, शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे.
कारण सध्या बुलडाण्यात (Buldhana) प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) हे विद्यमान खासदार असतानाही गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता बुलडाण्यातही उमेदवारीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, गायकवाडांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरीही तो अर्ज ते मागे घेऊ शकतात. त्यामुळे गायकवाडांच्या या कृतीवर वरिष्ठ काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.