Yavatmal News : महायुतीचे स्थानिक सूर बिघडले? 'शिंदे सेना-राष्ट्रवादी'चा फॉर्म्युला ठरला; भाजपचा 'सस्पेंस' कायम

Yavatmal Municipal Election : यवतमाळ नगरपालिकेसाठी शिंदे सेना–अजित पवार युती ठरली, भाजपची भूमिका अद्याप अस्पष्ट, महायुतीत संभ्रम कायम.
Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे सूर जुळताना दिसत नाही. राज्यात मोठा भाऊ असलेल्या भाजपने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे शिंदे सेना आणि राष्ट्रवादीने आपआपसात निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. यवतमाळ नगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची युती निश्‍चित झाली आहे. सेना 32 तर राष्ट्रवादी 26 जागांवर निवडणूक लढणार आहे. भाजपने अद्याप होकार दिला नसल्याने महायुतीबाबत संभ्रम कायम आहे.

जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ पालिकेवर आपली सत्ता असावी यासाठी राजकीय पक्षामध्ये चढाओढ सुरू आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढतीचे चित्र सुरुवातीला होते. मात्र, जागावाटपावरून महायुतीत ओढताण सुरू आहे. यामुळे यवतमाळ पालिकेसाठी शिवसेना शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची युती जवळपास निश्‍चित मानली जात आहे. दोन्ही पक्षात जागावाटपावरून वाटाघाटी पूर्ण झाली आहे.

जागावाटपासह उमेदवारही जवळपास निश्‍चित झाले आहेत. भाजपच्या ताब्यात असलेली ही पालिका आपल्याच हातात राहावी यासाठी भाजपही मोर्चेबांधणी करीत आहे. यासाठी महायुतीच्या प्रस्तावाला अद्याप भाजपने नकार दिला नसला तरी होकारही दिलेला नाही. यामुळे महायुतीबाबत संभ्रम आहे. महायुती तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत नागपूर येथे पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आहे. काही पदाधिकारी महायुतीच्या बाजूने आहे. यामुळे महायुतीचा निर्णय नागपुरातून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Terrorist Attack Cover in Policy : अपघात नव्हे, दहशतवादी हल्ल्यात नुकसान झाल्यास इन्शुरन्स पॉलिसीत कव्हर मिळतो का? काय आहे नियम?

भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. यावरच अंतिम चर्चा करण्यासाठी नागपूर येथे बैठक होणार असून मंगळवार (ता.११) पर्यंत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यवतमाळ पालिकेच्या माजी आरोग्य सभापती अरुणा गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com