Shivbhojan Thali : शिवभोजन थाळीवरुन राजकारण! मविआच्या काळात सुरु झालेल्या थाळीला राहिला नाही वाली; सरकारनं थकवली तब्बल 'इतक्या' कोटींची बिलं

Shivbhojan Thali : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारानं सुरु झालेल्या शिवभोजन थाळीवरुन आता राजकारण सुरु झालं आहे.
Shivbhojan Thali Yojana
Shivbhojan Thali Yojana
Published on
Updated on

Shivbhojan Thali : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारानं सुरु झालेल्या शिवभोजन थाळीवरुन आता राजकारण सुरु झालं आहे. सध्याच्या महायुती सरकारच्या काळात या थाळीला कोणी वाली राहिलेला नाही. कारण सरकारनं या योजनेचे तब्बल कोट्यवधी रुपये थकवले आहेत. शिवभोजन केंद्र चालकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर हा आरोप केला आहे. यामुळं शिवभोजन थाळीवरुन राजकारण सुरु असल्याचा आरोपही केला जात आहे. V

Shivbhojan Thali Yojana
Shivbhojan Thali : गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप करू नका..

शिवभोजन थाळीच्या थकीत अनुदानाच्या मागणीसाठी शिवभोजन थाळी केंद्र चालकांनी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन सुरु केलं आहे. मागील सहा महिन्यापासून शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे अनुदानाचे पैसे शासनाचे अद्याप दिलेले नाहीत. नागपूर जिल्ह्यातील शिवभोजन थाळीच्या अनुदानाचे जवळपास 20 कोटी रुपये थकीत आहेत, असा आरोप शिवभोजन केंद्र चालक भास्कर पराते यांनी केला आहे.

Shivbhojan Thali Yojana
Anjana Krishna Controversy: अंजना कृष्णा यांची जात तपासा म्हणणाऱ्या मिटकरींना 'या' नेत्यानं दिली लाजिरवाणी उपमा; अजितदादांवरही राग काढला

गरिबांना स्वस्तात जेवण मिळावं याकरिता शिवभोजन थाळी योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती. त्यावेळी प्रत्येक महिन्याला या योजनेच्या अनुदानाचे पैसे नियमित मिळायचे. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यापासून पैसे रखडल्याचा आरोप केंद्र चालकांनी केला आहे. या योजनेसाठी वार्षिक 270 कोटी रुपयांची तरतूद असताना सद्यःस्थितीत फक्त 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असंही आंदोलकांचं म्हणणं आहे.

Shivbhojan Thali Yojana
Satej Patil Mumbai politics : ठाकरेंचा ग्रीन सिग्नल मिळताच काँग्रेसचा लगेचच पुढचा डाव; सतेज पाटलांसाठी मुंबईत वायुवेगाने हालचाली

दरम्यान, नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाची शासकीय बिलं थकल्यानं दोन सरकारी कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या होत्या. यामुळं सरकारवर बरीच टीकाही झाली होती. या कंत्राटदारांसारखी आता आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर येण्याची सरकार वाट पाहत आहे का? असा सवालही यावेळी केंद्र चालक भास्कर पराते यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com