Anjana Krishna Controversy: अंजना कृष्णा यांची जात तपासा म्हणणाऱ्या मिटकरींना 'या' नेत्यानं दिली लाजिरवाणी उपमा; अजितदादांवरही राग काढला

Laxman Hake Vs Amol Mitkari : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्यातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राजकीय वातावरण पेटवलं आहे. त्यांनी थेट बारामतीत सभा घेत पवार कुटुंबियांवर जोरदार टीकेचा प्रहार केला होता.
Ajit Pawar, Amol Mitkari, IPS Anjali Krishna
Ajit Pawar’s viral video with a woman police officer in Solapur has triggered controversy, leading to political debates and demands for clarification.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध मुरुम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या IPS महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमबाजी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यानंतर अजितदादांवर एकीकडे टीकेची झोड उठवली जात असतानाच तिकडे त्यांचा लाडका आमदार असलेल्या अमोल मिटकरींना (Amol Mitkari) ओबीसी नेत्यानं थेट श्वानाची उपमा दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांना भिडणाऱ्या आयपीएस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांच्या जातपडताळणी, कागदपत्र तपासणीचं मागणी करणारं पत्रच यूपीएससीला लिहिलं होतं. यानंतर अशाप्रकारे एखाद्या महिला आयपीएस अधिकार्याबाबत मागणी केल्यानं मिटकरींवर चौफेर टीका झाली. त्यानंतर त्यांनी आपलं ट्विट डिलिट करत दिलगिरीही व्यक्त केली आहे. पण आता मिटकरींवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्यातील फडणवीस ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी राजकीय वातावरण पेटवलं आहे. त्यांनी थेट बारामतीत सभा घेत पवार कुटुंबियांवर जोरदार टीकेचा प्रहार केला होता. आता त्यांनी अजित पवारांवर खोचक टीका करतानाच आपल्या मिटकरी नावाच्या श्वानाला आवरा. तो तुम्हाला तोंड काळं करायला लावणार, अशी जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

हाके म्हणाले, अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. यूपीएससी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणं शोभत नाही, त्यांनी भाषा सुधारावी. जर ते होत नसेल तर यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊ नका. तुम्हाला बाबासाहेब वगैरे कळणार नाहीत. तुमची कुवत किंवा लायकी नाही. तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं? याचदरम्यान,त्यांनी आपल्या मिटकरी नावाच्या श्वानाला आवरा असा खोचक सल्लाही दिला.

Ajit Pawar, Amol Mitkari, IPS Anjali Krishna
Satej Patil Mumbai politics : ठाकरेंचा ग्रीन सिग्नल मिळताच काँग्रेसचा लगेचच पुढचा डाव; सतेज पाटलांसाठी मुंबईत वायुवेगाने हालचाली

लक्ष्मण हाके यांनी यावेळी अजितदादांनी यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊ नये. शरद पवार यांचा वारसा सांगू नये,असंही म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर तुम्ही वरिष्ठ सभागृहात पाठवलात. त्या सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे. त्या मिटकरीमुळे तुम्ही कितीवेळा तोंडावर पडणार आहात? हा मिटकरी मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाला आणि याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केलं. युपीएससीचा लाँग फॉर्म तरी माहिती आहे का? मिटकरी हा कोणत्यातरी समाजाला टार्गेट करतो, हा नकलाकार असल्याचा वारही हाके यांनी केला.

आता लक्ष्मण हाके यांच्या टीकेला अमोल मिटकरींनीही जशास तसा पलटवार केला आहे. त्यांनी ट्विटमधून हाकेंवर हल्ला चढवला आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, हाक्या तुझी केसं मात्र नकली आहेत हे सलूनवाल्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. तुझी अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे, हे तुझ्या एकंदरीत मीडियाशी बोलताना लक्षात येतंय .तूर्तास माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर दे.तु OBC नेता कधी झाला व ड्रायव्हर चा पगार कधी देतोस इतकच ! असं प्रत्युत्तरादाखल खोचक टीका मिटकरींनी हाकेंवर केली आहे.

Ajit Pawar, Amol Mitkari, IPS Anjali Krishna
Sanjay Rathod News : आता बंजारा समाज आंदोलनाच्या तयारीत! हैदराबाद गॅझेटनूसारच 'एसटी'मधून आरक्षणाची मागणी!

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी करमाळा तालुक्याच्या पोलिस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्यावर कारवाई रोखण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला जात आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं राजकीय वर्तुळातून अजितदादांवर टीकेचा भडिमार केला जात आहे. अशातच आता अमोल मिटकरींनी दादांच्या अडचणी वाढवल्याचं दिसून आलं होतं.

आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी थेट या आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीत घोळ झाल्याचा संशय व्यक्त केला. शिवाय त्यांनी IPS अंजना कृष्णा यांची नियुक्ती देखील बनावट कागदपत्रांद्वारे झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित करत खळबळ उडवून दिली होती. मात्र,मिटकरींनी अंजना कृष्णा यांची थेट पूज खेडकरशी तुलना केली. यामुळे पुन्हा विरोधकांनी अजित पवारांच्या पक्षावर सडकून टीका केली.

Ajit Pawar, Amol Mitkari, IPS Anjali Krishna
Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस 'मराठा' समाजाचे नवे 'राजकीय नायक'? शिंदे, अजितदादांना पद्धतशीरपणे लांब ठेवले...

याचदरम्यान,अमोल मिटकरी यांच्या मागणीमुळे पक्षाची होत असलेली बदनामी लक्षात घेता आता वरिष्ठांच्या सांगण्यावरून आमदार मिटकरी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलं की,सोलापूर घटनेसंदर्भात केलेलं ट्विट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो, असंही म्हटलं होतं.

मिटकरी म्हणाले, ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर माझी वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलीस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे.

Ajit Pawar, Amol Mitkari, IPS Anjali Krishna
Supreme Court News : अखेर सुप्रीम कोर्टाने विरोधकांची मागणी केली मान्य; मतदारयाद्यांबाबत निवडणूक आयोगाला महत्वाचा आदेश...

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एकमेकांवर अतिशय खालच्या पातळीवर जात टीका केल्यामुळे राजकारण पेटलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्यातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर घणाघाती टीका करतानाच बारामतीचं राजकारण पेटवलं आहे. त्यांनी थेट बारामतीत सभा घेत पवार कुटुंबियांवर जोरदार टीकेचा प्रहार केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com