Raju Parve : फडणवीसांनी शिवसेनेचा नेता फोडला; राजू पारवेंचा भाजपमध्ये प्रवेश

Umred Assembly Constituency Devendra Fadnavis BJP Shiv Sena : राजू पारवे यांच्या भाजप प्रवेशाने उमरेडमध्ये भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
Devendra Fadnavis, Raju Parve
Devendra Fadnavis, Raju ParveSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार राजू पारवेंच्या राजकीय उड्या अजूनही थांबलेल्या नाहीत. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनावरून सोमवारी उमरेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राजू पारवे यांनी मंगळवारी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

राजू पारवे यांच्या भाजप प्रवेशाने उमरेडचे भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांची बाजू भक्कम झाल्याचे मानले जाते. पारवे यांची खंडित झालेली राजकीय कारकीर्द पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन त्यांना फडणवीस यांनी दिले आहे. राजू पारवे उमरेडचे आमदार होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत सुधीर पारवे यांचा पराभव केला होता.

Devendra Fadnavis, Raju Parve
Eknath Shinde News : गहाण ठेवलेला धनुष्यबाण मुक्त केला; मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले?

लोकसभेच्या निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून भाजपला त्यांना उमेदवार करायचे होते. मात्र ही जागा शिवसेनेने सोडण्यास नकार दिला. त्यामुळे पारवे यांना शिवसेनेत पाठवण्यात आले होते. ते महायुतीचे उमेदवार होते. मात्र यात त्यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे पारवे यांचीसुद्धा भाजपात प्रवेश करण्याची इच्छा होती. मात्र शिंदे सेनेने रामटेक लोकसभेचा आग्रह सोडला नाही. त्यामुळे ते नाईलाजाने शिवसेनेत दाखल झाले होते.

विधानसभेच्या निवडणुकीत उमेरडमधून त्यांना उमेदवारीची आशा होती. मात्र यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला. याशिवाय भाजपनेसुद्धा उमरेडची जागा शिवसेनेला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे पारवे यांनी बंडखोरी केली होती. सोमवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. राजू पारवे यांच्यामुळे भाजपचे सुधीर पावरे यांची अडचण होणार होती.

Devendra Fadnavis, Raju Parve
CM Shinde challenged MVA : '..त्यासाठी आमची समोरासमोर येवून चर्चा करण्याची तयारी आहे' ; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला आव्हान!

देवेंद्र फडणवीस यांनी यात मध्यस्थी केली. राजू पारवे यांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले. खंडित झालेली राजकीय कारकीर्द पुन्हा सुरू करण्याचा शब्द फडणवीस यांनी त्यांना दिला. त्यांच्या आवाहनानुसार पारवे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर आज लगेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपात प्रवेश केला.

सहा महिन्यात पारवे यांचा काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असा प्रवास झाला आहे. आता त्यांना भाजपा कुठे सामावून घेते हे विधानसभेच्या निवडणुकीनंतरच समजणार आहे. सध्या तरी पारवे यांच्या प्रवेशाने उमरेडमध्ये भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com