Eknath Shinde News : गहाण ठेवलेला धनुष्यबाण मुक्त केला; मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले?

Political News : शिवसेनेतील 40 आमदार, 13 खासदारानी उठाव करीत आघाडी सरकार खाली खेचले. या उठवाला राज्यातील शिवसैनिकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे काही मंडळींनी गहाण ठेवलेला धनुष्यबाण मुक्त करता आला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Satara News : राज्यात 2019 साली झालेलया विधानसभा निवडणुकीनंतर जनतेने भाजप-शिवसेना सरकारला बहुमत दिले होते. मात्र, हा जनादेश टाळून राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित आघाडी सरकार आले. हे सरकार जवळपास अडीच वर्ष चालले. त्यावेळी शिवसेनेतील 40 आमदार, 13 खासदारानी उठाव करीत आघाडी सरकार खाली खेचले. या उठवाला राज्यातील शिवसैनिकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे काही मंडळींनी गहाण ठेवलेला धनुष्यबाण मुक्त करता आला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाजवळील भंडारी मैदानावर आयोजित जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली. (Eknath Shinde News)

महाविकास आघाडीने बंद पाडलेल्या जवळपास सर्व योजना आम्ही सुरू केल्या नव्हे तर त्या पुढे नेल्या आहेत. अडीच वर्षात महाविकास आघाडीने इरिगेशनच्या केवळ चार सुप्रीमा मंजूर केल्या. मात्र, महायूतीने केवळ दोन वर्षात तब्बल लाखो हेक्टरवर जमीन ओलिताखाली आणलेली असून, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

राज्यातील विरोधकांच्या पोटात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे दुखत आहे. ही योजना काही जणांनी चुनावी जुमला असल्याची घोषणा केली आहे. बंद पडेल, पैसेच मिळणार नाहीत, असा खोटा प्रचार सुरू करण्यात आला. परंतु, आमची "देना बँक आहे, लेना बँक नव्हे, कोणी ही योजना बंद पडणार नाही" अशी ग्वाही देत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

CM Eknath Shinde
Uddhav Thackeray : ऐन विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी केली 'या' 5 नेत्यांची हकालपट्टी

आम्ही बहिणींना दीड हजार रुपयेच देणार नाही तर चांगली ताकद दिलीत तर दीडचे दोन हजार, दोनचे अडीच हजार, अडीचचे तीन हजार असे करत लाडक्या बहिणींना आम्ही देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसारख (Narendra Modi) लखपती करण्याचे स्वप्न ठवले आहे. ही योजना सुपरहिट करणार आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न आता विरोधक विचारू लागले असून, त्यांना मी सांगू इच्छितो की आमच्या लाडक्या बहिनींच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याला फाशी दिल्याशिवाय राहणार नाही. बदलापूर घटनेत हेच विरोधक प्रथम आरोपींना भर चौकात फाशी द्या, म्हणत होते. मात्र, पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ या नरधमावर गोळ्या झाडल्या तर हेच विरोधक अन्याय झाला, असा टाहो फोडू लागले. हे लोक दुतोंडी आहेत. आमच्या मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना कधीच सोडणार नाही. तेव्हा सर्वांनी महायुतीला पाठबळ द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

CM Eknath Shinde
Shahu Maharaj News : 'कोल्हापूर उत्तर'मध्ये मोठा ट्विस्ट; खासदार शाहू महाराजांची मोठी घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com