Sanjay Rathod : मंत्री राठोड यांच्या प्रस्तावामुळं महायुती सरकारचं पितळ उघडं; 1500 कोटींची काम रद्दचा निर्णय

Shiv Sena Minister Sanjay Rathod Cancels 1500 Crore Water Conservation Projects in Yavatmal : शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी घेतलेल्या एका प्रस्तावामुळं राज्यातील महायुती सरकारची आर्थिक परिस्थिती उघडी पडल्याचं समोर आलं आहे.
Sanjay Rathod
Sanjay RathodSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics 2025 : महाराष्ट्रातील भाजप महायुती सरकारची आर्थिक परिस्थिती काय आहे, यावरून अनेकदा कोंडी झाली आहे. महायुतीने सुरू केलेल्या माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनुदान देखील रखडत वितरीत केलं जात आहे. दीड हजारावरून 2100 रुपये देण्याचं आश्वासन देखील अजून पाळलं गेलेलं नाही.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर निर्णय नाही, याशिवाय अनेक योजनांचं अनुदान देखील थकलं आहे. त्यामुळे राज्यातील महायुती सरकारची आर्थिक परिस्थितीवरून विरोधक देखील कोंडी करतात. महायुती सरकारने अनेकदा आर्थिक कोंडीचे आरोप फेटाळले आहेत. पण आता शिवसेनेचे यवतमाळमधील मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विभागाला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देताच, महायुती सरकारची आर्थिक परिस्थिती कशी आहे? याचं पितळ उघडं पडलं आहे.

राज्यात 2001 ते 2024 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मंजुरी दिलेली. मात्र अद्याप सुरू न झालेली, अर्धवट असलेली सुमारे 1500 कोटी रुपयांची जलसंधारणाची कामे रद्द केली करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी ही कामे रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत.

Sanjay Rathod
Nitin Gadkari On Shirdi Road : नितीन गडकरींना अहिल्यानगरमध्ये यायला वाटते लाज! त्याला 'हा' रस्ता आहे, कारण...

राज्याची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याने अनेक योजनांना कात्री लावली जात आहे. त्यामुळे नवीन विकास कामांना मंजुरी न देण्याची भूमिका महायुती (Mahayuti) सरकार एका बाजूला मांडत आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र तीर्थक्षेत्र, पर्यटनासाठी हजारो कोटींची घोषणा केली जात आहे. यातच आता विकासकामांना निधी मिळत नसल्याने नवीन आमदारांमध्ये नाराजी आहे.

Sanjay Rathod
CM Fadnavis : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर; सीएम फडणवीसांनी बैठकीनंतर दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

पुढील चार पाच महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची शक्यता आहे. त्यामुळे नवीन विकासकामांचाही तगादा वाढणार असल्याने सरकार काटकसरीचा भूमिकेत आहे. कोणत्याही परिस्थिती दायित्व वाढू नये व वाढलेले दायित्व कमी करण्यासाठी सर्वच विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. त्याचा एक भाग म्हणून जलसंधारण विभागाने अपूर्ण व सुरू न झालेली कामे रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे.

मंत्री संजय राठोड यांनी मृद व जलसंधारण विभागात जी कामे गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ केवळ प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात येत आहे. अशी कामे रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. रद्द होणारी कामे ही 1200 ते 1500 कोटी रुपयांपर्यंतची आहे. मंत्री राठोड यांनी हा प्रस्ताव तयार करण्याच्या निर्देश देताच, राज्यातील महायुती सरकारची आर्थिक परिस्थिती खालवल्याच्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com