Shivsena UBT Politics : भाजपच्या बालेकिल्ल्यात टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा 'मास्टर प्लॅन', एक जिल्हा...

Shiv Sena UBT Local Body Election : महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारी करिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नुकतीच मुंबईतील शिवसेना भवनात बैठक झाली.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फारशा गांभीर्याने लढवत नव्हते. भाजप सांगेल तेवढ्या जागेवर तडजोड केली जायची. त्यामुळे नागपूर शहर असो वा विदर्भात शिवसेनेला अपेक्षित ताकद निर्माण करता आली नाही. विधानसभा निवडणुकीत विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उद्धव ठाकरेंच्या वतीने भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात मात देण्यासाठी स्थानिक निवडणुकांसाठी वेगळी स्टॅटेजी तयार केली आहे. एक जिल्हा एक नेता असे धोरण ठरवण्यात आले आहे. मात्र या निवडणुका स्वबळावर लाढवायच्या की महाविकास आघाडीने हे अद्याप स्पष्ट केले नाही.

महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारी करिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नुकतीच मुंबईतील शिवसेना भवनात बैठक झाली. या बैठकीला खासदार, आमदार, पक्ष नेते, उपनेते तसेच राज्य संघटकांना बोलावण्यात आले होते. यात एक पक्ष एक नेता आणि त्यांच्या सोबतीला उपनेता व राज्य संघटक अशी उतरंड ठरवण्यात आली. या तिघांना आढावा, बैठका घेण्याचे अधिकार देण्यात आले. सोबतच उमेदवार निवडण्यातही याच तिघांची प्रमुख भूमिका राहणार आहे.

नागपूरची जबाबदारी भास्कर जाधवांवर

नागपूर जिल्ह्यासाठी नेता म्हणून भास्कर जाधव, उपनेता उपनेता विजय कदम, सुधीर सूर्यवंशी तर राज्य संघटक म्हणून सागर डबरासे यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी विभागाचे, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, नेते, उपनेते तसेच काही मुंबईतील नेते परस्पर निर्णय घ्यायचे. उमेदवारही जाहीर करायचे. मात्र आता तसे होणार नाही.

Shivsena UBT News
Gopichand Padalkar : 'जतला माझा कोणी राजकीय शत्रू नाही, पण...'; गोपीचंद पडळकर यांचा रोख कोणाकडे?

नवी रणनीती फायद्याची

विभागाचे नेते, उपनेते यांच्याकडे ताकद असल्याने परस्पर उमेदवारी मिळवत होते. थेट मुंबईतून उमेदवारी आणत होते. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होत होता. स्थानिक नेत्यांना किंवा जिल्हा संपर्क प्रमुखांना निर्णय झाल्यानंतरच अनेक गोष्टी कळत होत्या. काही जागा कशासाठी व कोणासाठी सोडण्यात आल्या याचा कोणालाच थांगपत्ता लागत नव्हता. काही उमेदवार पक्षाशी संबंध नसताना थेट मुंबईतूनच उमेदवारी घेऊन यायचे. आता नव्या स्टॅटेजीमुळे हे टळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

...तर 'त्या' नेत्यांना करणार बाजुला

मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत प्रत्येक जिल्हासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कमिटीच्या निरीक्षणातच सर्व निवडणुका पार पाडल्या जातील, असेही जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या टीमसोबत जिल्हाप्रमुख यांनी बैठका घ्याव्या लागणार आहेत. जे पदाधिकारी पक्ष संघटनेकरीता काम करीत नसेल त्यांना बाजूला करून नवीन लोकांना संघटनेत जागा दिली जाईल, असेही याच बैठकीत सांगण्यात आले.

Shivsena UBT News
Indian Army : 'पाक'च्या निशाण्यावर होते गोल्डन टेम्पल; धक्कादायक माहिती समोर, भारताने असा केला मुकाबला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com