Chandrapur : दिक्षाभूमीवर स्वच्छतेसाठी पेटली शिवसेनेची मशाल, शेकडो कार्यकर्ते राबले...

यावेळी प्रथमच शिवसेनेचे (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) कार्यकर्तेही या दिक्षाभूमीवर राबताना दिसले.
Shivsena - Uddhav Thackeray
Shivsena - Uddhav ThackeraySarkarnama

चंद्रपूर : राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचे पडसाद आता धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांतसुद्धा उपटायला सुरुवात झाली आहे. चंद्रपुर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर धम्म चक्र अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता सेवक म्हणून भूमिका पार पाडली. येथे येणाऱ्या लाखो बाबासाहेबांच्या अनुनायांना अव्यवस्थेचा त्रास होवून नये, म्हणून दोन दिवस शेकडो शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात राबत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) नागपूर (Nagpur) येथे १४ आणि १५ ऑक्टोंबर १९५६ रोजी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. त्यानंतर १६ ऑक्टोंबरला चंद्रपुरात (Chandrapur) लाखो दलित बांधवांना डॉ. बाबासाहेबांनी धम्म दिला. तेव्हापासून १५ आणि १६ ऑक्टोंबरला येथील दिक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने देशभरातील लाखो अनुनायी येथे येतात. त्यांच्या मदतीसाठी दरवर्षी मोठ्या संख्येत सामाजिक संस्था पुढे सरसावतात. यावेळी प्रथमच शिवसेनेचे (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) कार्यकर्तेही या दिक्षाभूमीवर राबताना दिसले.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बहुजन समाजातील मतदार त्यांच्याकडे आकृष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा शिवसेनेचे हिंदूत्व आम्हाला मान्य असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्यकर्ते स्वच्छता सेवक म्हणून राबताना दिसणारे चित्र बरेच बोलके होते. जय भीम, जय शिवरायच्या टी-शर्ट परिधान करुन शेकडो शिवसेनेचे कार्यकर्ते दिक्षाभूमी स्वच्छ करण्यासाठी झटत होते.

Shivsena - Uddhav Thackeray
...तर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते : अजित पवार काय म्हणाले?

पहिल्यांदाच हा प्रकार बघायला मिळाला. तो सकारात्मक होता, अशा प्रतिक्रीया बौध्द अनुयायांनी व्यक्त केल्या. बाबासाहेबांनी दिलेली घटना धोक्यात आली आहे. आता सर्वांनी एकत्र मिळून तिचे संरक्षण केले पाहिजे. याच दिक्षाभूमीवर बाबासाहेबांना सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली. स्वच्छता सेवक म्हणून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रीया, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे) संदीप गिऱ्हे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com