...तर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते : अजित पवार काय म्हणाले?

Ajit Pawar : ठोशास ठोशा कसा द्यायचा त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भुजबळ साहेब.
Ajit Pawar
Ajit PawarSarkaranama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांचा आज अमृत महोत्सव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मविआचे दिग्गज नेते एकाच मंचावर आले होते. भुजबळ यांचा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध नेत्यांनी भुजबळ यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावेळी भाषण केले.

भुजबळ यांनी आपल्या कारकिर्दीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांच्यावर आ़जपर्यंत कोणकोणते आघात झालेत हे आपण सर्व जाणतोच. दुसऱ्या नेत्यावर असे आघात झाले असते तर त्याने राजकारण सोडलं असतं. नव्या उमेदीने त्यांनी हे सर्व सहन केलं. भुजबळांचा पुनर्जन्म झाला. भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले असते. पण तसा योग आला नाही. भुजबळ साहेबांनी अभिनयसुद्धा केले आहे. ते आज राजकारणात आहेत, त्यामळे आज महाराष्ट्र एका नटसम्राटाला मुकलाय, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
महाराष्ट्र सदन कितना सुंदर.. पर बनानेवाला अंदर : भुजबळांनी खंत बोलवून दाखवली!

यावेळी अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हंटले की, जेव्हा पंधरा लोक गेले तेव्हा तुम्ही भुजबळांना सांगितले असतं ना, आज तुम्ही मुख्यमंत्री म्हणून दिसला असता. ठोशास ठोशा कसा द्यायचा त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भुजबळ साहेब. भुजबळ साहेब याच्यात खूप तरबेज आहेत. भुजबळ साहेब पालकमंत्री झाल्यानंतर नाशिकचा विकास झाला. राजकारणच नाही शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी क्रांती केली, असेही पवार म्हणाले.

छगन भुजबळ यांच्या या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशातील आणि राज्यातील विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला, जेष्ट लेखक-कवी डॉ. जावेद अख्तर, यांच्यासह देशभरातील अनेक नेतेमंडळी तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, साहित्य यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com