Shiva Murder Case : शिवा वझरकर हत्याकांडाचा तपास रामनगर पोलिसांकडून काढला, आता जबाबदारी एलसीबीकडे !

Candle March : आरोपींवर मोक्का लावण्यासाठी चंद्रपुरात कँडल मार्च, सर्वपक्षीयांचा सहभाग.
Shiva Vazarkar
Shiva VazarkarSarkarnama
Published on
Updated on

Shiva Murder Case : चंद्रपुरातील शिवसेना उबाठा गटाचे युवा शहरप्रमुख शिवा वझरकर यांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडानंतर आता आरोपींविरोधात संतापाची लाट पसरली आहे. आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी काल (ता. 29) चंद्रपुरात सर्वपक्षीय कँडल मार्च काढण्यात आला.

शिवा वझरकर हत्याकांडाचा तपास रामनगर पोलिसांकडून काढून घेण्यात आला आहे. तपासाची जबाबदारी आता एलसीबीकडे असणार आहे. शिवा हत्याकांडातील आरोपींना बिर्याणीची मेजवानी देणाऱ्या रामनगर ठाण्यातील पोलिस शिपाई विनोद यादव यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. शिवा या तरुण कार्यकर्त्याच्या हत्येनंतर चंद्रपुरातून आता प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

Shiva Vazarkar
Chandrapur Protocol Dispute : पत्रिकेवर रातोरात आमदार धोटेंऐवजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आले, कसे काय?

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी वझरकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. याचवेळी त्यांनी या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्याच्या सूचनाही पोलिस विभागाला दिल्या. शिवाची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत कार्यवाही करावी, सोबतच अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली.

चंद्रपुरातील जटपुरा गेट ते प्रियदर्शिनी सभागृहापर्यत काल सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेते, वझरकर कुटुंबीय व चंद्रपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणात कारवाई झाली नाही, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्हा बंद करू, असा इशारा शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी दिला आहे.

यावेळी शिवा वझरकर यांच्या आई अतिशय भावनिक झाल्या. आपल्या एकुलत्या मुलाची त्यांनी हत्या केली. त्यांच्यावर जर कठोर कार्यवाही झाली नाही तर आपण आपले जीवन संपवू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शिवा वझरकर हत्याकांडाचा तपास रामनगर पोलिसांकडे होता. रामनगरचे पोलिस निरीक्षक राजेश मुळे यांनी पोलिस उपनिरीक्षक कपिल केकाडे यांच्याकडे सोपविला होता. यांनतर या प्रकरणातील आठ आरोपींना अटक करण्यात आली होती.

पोलिसांकडून आरोपींची मदत केली जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्याचा ऑडिओ पुरावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ऐकविण्यात आला. यानंतर या प्रकरणात तपास आता रामनगर पोलिसांकडून काढून घेण्यात आला आहे. आता एलसीबी शिवा हत्याकांडाचे गूढ शोधून काढणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आठही आरोपींची पोलिस कोठडी आज (ता. ३०) संपणार आहे. आजच त्यांना न्यायालयापुढे उभे करून पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी पोलिस करणार आहेत. सातत्याने होत असलेल्या वाढत्या गुन्हेगारीमुळे चंद्रपूरकरांत चांगलीच धास्ती पसरली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com