Shivsena : काँग्रेसला पराभवाची धूळ चारण्यासाठी शिंदेंची रणरागिणी मैदानात? रिसोडमधून उमेदवारी...

Shivsena Bhavana Gawali Eknath shinde : वाशिम जिल्ह्यातील तीन पैकी दोन जागावर भाजपकडे आहेत. तर, रिसोडची जागा काँग्रेसकडे आहे. अमित झनक हे येथून विद्यमान आमदार आहे.
Nana Patole & Eknath Shinde
Nana Patole & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने भावना गवळी यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. लोकसभेत महायुतीला फटका बसला. भावना गवळी यांना तिकीट न देऊनही शिंदे गटाने यवतमाळ-वाशिमची जागा गमावली. भावना गवळी यांना विधान परिषेदवर संधी देण्यात आली. मात्र, भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.

पक्षाने आदेश दिला तर रिसोडची जागा लढवू, असे सांगत भावना गवळी यांनी रिसोडच्या जागेवर दावा सांगत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

वाशिम जिल्ह्यातील तीन पैकी दोन जागांवर भाजपकडे आहेत. तर, रिसोडची जागा काँग्रेसकडे आहे. अमित झनक हे येथून विद्यमान आमदार आहे. विधानसभेसाठी एक एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शिंदें भावना गवळी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Nana Patole & Eknath Shinde
Kirit Somaiya : नाराज किरीट सोमय्या शेवटी मनातलं बोलले, 'बावनकुळे, फडणवीसांपेक्षा जास्त...'

रिसोडवर कोणाचा दावा?

वाशिम जिल्ह्यातील वाशीम, कारंजा मतदारंसघात भाजपचे आमदार आहेत तर, रिसोडमध्ये काँग्रेसचा आमदार आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाकडे असणार याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटाकडून या मतदारसंघावर दावा सांगितला जाऊ शकतो. तर, शिंदे गट देखील हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी उत्सुक आहे. 2019 मध्ये हा मतदारसंघ युतीमधून शिवसेनेने लढला होता. त्यामुळे शिंदे गटाचा दावा या जागेवर मजबुत मानला जातो आहे.

रिसोडवर भाजपचाही दावा

रिसोड मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 2019 ला गेला होता. मात्र, या मतदारसंघातून भाजपचे विजयराव जाधव यांनी सलग दोन वेळा विजय मिळवला होता. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचा दावा कायम आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे निश्चित मानला जातो आहे.

Nana Patole & Eknath Shinde
Sharad Pawar Vs Bjp: सांगलीत मोठा राजकीय भूकंप; शरद पवार भाजपला धक्का देणार? माजी खासदाराने घेतली भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com