Nitesh Rane News: देसाईंचा एन. डी . स्टुडिओ ठाकरेंना हवा होता ; राणेंचा गंभीर आरोप

Nitesh Rane On Nitin Desai Death: 'ठाकरे' सिनेमाचं शूटिंग नितीन देसाईंच्या एन.डी स्टुडिओमध्ये झालं होतं. त्याचे पैसे दिलेत का?
Nitesh Rane, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Nitesh Rane, Uddhav Thackeray, Sanjay RautSarkarnama

Mumbai Political News: कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) आत्महत्या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) ठाकरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. "नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडिओ उद्धव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता, त्यासाठी मातोश्रीच्या जवळचा माणूस देसाईंना धमक्या देत होता," असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही नितेश राणेंनी गंभीर आरोप केले आहेत. 'ठाकरे' सिनेमाचं शूटिंग नितीन देसाईंच्या एन.डी स्टुडिओमध्ये झालं होतं. त्याचे पैसे दिलेत का?" असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊतांनी याचे उत्तर द्यावे असे नितेश राणे म्हणाले.

"नितीन देसाई चांगले व्यक्ती होते. त्यांचा एन.डी स्टुडिओ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना हवा होता. त्यासाठी देसाईंवर दबाव टाकला जात होता.'मातोश्री'जवळच्या व्यक्तीकडून त्यांना धमक्या दिल्या जात होत्या.

Nitesh Rane, Uddhav Thackeray, Sanjay Raut
NCP News : योगेश ससाणेंनी दोन पत्त्यांचा गेम खेळला ; हातात दहा हुकमी एक्के ठेवले ; राष्ट्रवादीलाच ‘कन्फ्यूज’ केले...

देसाई आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून एडलवाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावण्यात आली होती. पोलिसांकडून त्यांच्याकडे सध्या चौकशी सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा आरोप केला आहे.

Nitesh Rane, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Udayanraje Bhosale Poetry: “आमच्या मनात आहेत, आठवले…म्हणूनच आम्ही त्यांना गटवले..; उदयनराजेंनी घेतली आठवलेंची फिरकी..

"सनी देओल त्यांचे कर्ज ते फेडू शकले नाहीत म्हणून त्यांच्या बंगल्यावर जप्तीची नोटीस आली होती. परंतु 24 तासात सूत्रे हलली. दिल्लीतून त्यांचा लिलाव थांबवला गेला. मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही? नितीन देसाई दिल्लीमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांना भेटले होते. त्यांचा स्टुडिओ वाचविला जावा यासाठी त्यांनी डोळ्यातून पाणी काढलं होतं. माझं स्वप्न वाचवा असे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांना वाचवले नाही. दिल्लीतून येऊन त्यांनी आत्महत्या केली," असा आरोप राऊतांनी केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com