Assembly Election 2024 : 35 वर्षानंतर काँग्रेसमधील 'या' कुटुंबाचा काटोलवर ठाम दावा, अनिल देशमुख कुठून लढणार?

Katol Assembly Constituency : अनिल देशमुख 1995 पासून काटोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र, काँग्रेसनं काटोलवर दावा केल्यानं अनिल देशमुखांसमोर पेच निर्माण झाला आहे.
anil deshmukh.jpg
anil deshmukh.jpgsarkarnama
Published on
Updated on

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. महायुतीत या जागेवरून तडजोड झाल्यास देशमुखांपुढे पुन्हा कुठून लढायचे याचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांचे चिरंजीव याज्ञवल्क्य जिचकार यांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

"आपण काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहोत. काँग्रेसनेसुद्धा आपणास होकार दिला आहे. महाविकास आघाडी हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडणार आहे. त्यामुळेच आपण काम करायला सुरुवात केली आहे. देशमुख कुठून लढणार हा त्यांचा व त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. ते मी सांगू शकत नाही," असे याज्ञवल्क्‍य जिचकार यांनी सांगितले.

अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) 1995 पासून काटोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना ते राज्याचे गृहमंत्री होते. यापूर्वी शिक्षण, क्रीडा, अबकारी, अन्न व नागरी पुरवठामंत्री अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. 1995 मध्ये सर्वप्रथम ते अपक्ष निवडून आले होते. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.

anil deshmukh.jpg
NCP and Katol Assembly Constituency : काटोलवरून पवार गटातील पेच संपला, सलील देशमुखांचा मोर्चा मोर्शीकडे?

शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर राष्ट्रवादीत दाखल झाले होते. त्यानंतर परत सलग तीन वेळा ते निवडून आले. आघाडीच्या तीनही सरकारमध्ये ते मंत्री होते. 2014 मध्ये देशमुखांना त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी त्यांना सर्वप्रथम पराभवाचा धक्का दिला होता.

तत्पूर्वी, श्रीकांत जिचकार काटोल-नरखेडचे आमदार होते. ते राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा होते. शरद पवार यांच्या पुलोदच्या प्रयोगामुळे सुनील शिंदे यांच्याकडून जिचकार यांचा पराभव झाला होता. तब्बल 35 वर्षानंतर जिचकार घराण्यातून याज्ञवल्क्य यांनी काटोलवर दावा केला आहे.

anil deshmukh.jpg
Anil Deshmukh to Fadnavis : 'देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहतोय' ; अनिल देशमुखांचं आव्हान!

डॉ. जिचकार यांची विद्याविभूषित, विद्वान राजकारणी अशी ओळख होती. सर्वाधिक पदव्या त्यांनी घेतल्या होत्या. उभ्या महाराष्ट्राला त्यांच्याविषयी औत्युक्य व कुतूहल होते. काटोलमध्ये आजही आदराने त्यांचे नाव घेतले जाते. श्रीकांत जिचकार यांच्या नावामुळे याज्ञवल्क्य जिचकार यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील तीन वर्षांपासून त्यांची काटोल मतदारसंघात तयारी सुरू आहे. स्व. श्रीकांत जिचकार फाउंडेशनच्या माध्यमातून रोजगार मेळावे व महिला मेळावे ते घेत आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com