Anjali Bharati: अंजली भारतींचा अखेर माफीनामा! अमृता फडणवीसांबाबत केलेल्या विधानावर व्हिडिओद्वारे मांडली सविस्तर भूमिका

Anjali Bharati: या घटनेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला भर चौकात अत्याचार करु अशा धमक्या दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Amruta Fadnavis_Anjali Bharati
Amruta Fadnavis_Anjali Bharati
Published on
Updated on

Anjali Bharati: नागपूर इथं एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गायिका अंजली भारती यांनी माफीनामा सादर केला आहे. एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी या प्रकरणी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. आपल्या बोलण्याचा उद्देश आणि त्या ओघात झालेली चूक आपल्या लक्षात आल्याचं त्यांनी मान्य केलं आहे.

Amruta Fadnavis_Anjali Bharati
Ajit Pawar Plane Crash : अखेरच्या क्षणापर्यंत कामाचा ध्यास..., अजितदादांची एक्सवरील शेवटची पोस्ट चर्चेत

अंजली भारतींवर गुन्हा दाखल

गायिका अंजली भारती यांनी अमृता फडणवीसांबाबत केलेल्या विधानाप्रकरणी त्यांच्यावर भंडारा इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु्न्हा दाखल झाल्यापासून त्यांचा फोन बंद होता, त्या नॉट रिचेबल होत्या. पण आता एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून त्या समोर आल्या आहेत. या व्हिडिओतून त्यांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली आहे. तसंच आपल्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोन करुन धमक्या दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Amruta Fadnavis_Anjali Bharati
Malegaon Sugar Factory: अजितदादांची अचानक एक्झिट अन् 'माळेगाव'ची सुवर्णाक्षरांनी नोंद; पदाधिकाऱ्यांच्या भावनांचा फुटला बांध

अंजली भारती नेमकं काय म्हणाल्या?

व्हिडिओ संदेशात अंजली भारती म्हणतात, काल माझा युट्युबवरचा एक व्हिडिओ अचानक सर्व राष्ट्रीय स्तरावर व्हायरल होत होता. भाजपकडून माझ्यावर टीकाटिप्पणी सुरु होती. मी भीम मेळाव्यात प्रबोधन करत असताना सर्व जाती-धर्मातील महिलांची बाजू मांडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांवर मी बोलत होते. यामध्ये चिमुकल्या मुली सुद्धा अत्याचारांच्या घटनांना कशा बळी पडलेल्या आहेत, हे सांगताना यासंबंधी देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मला हे लक्षात आणून द्यायचं होतं, त्यांचं लक्ष वेधायचं होतं. आत्ताचे कायदे अशा घटनांना आळा घालण्यात अपुरे पडत आहेत, त्यासाठी तुम्ही याबाबत ठोस कायदे करावेत. तुमच्या हाती सर्वकाही असताना तुम्ही याकडं का लक्ष देत नाही? तुम्ही याबाबत कायदा कधी कठोर करणार? अशा अत्याचाराच्या घटना सातत्यानं घडत असताना तुमच्या पत्नीबाबत देखील अशी घटना घडू शकते त्यानंतर तुम्ही कायदा करणार आहात का? हेच मला त्यांना सांगायचं होतं.

Amruta Fadnavis_Anjali Bharati
Ajit Pawar AI Audio: अजित पवारांचा शेवटचा संदेश, AIची कमाल; ऑडिओ क्लीप ऐकून तुमच्याही भावना येतील दाटून

भाजपच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर ओराप

पण बोलण्याच्या ओघामध्ये अमृता फडणवीसांबाबतचे ते विधान चुकून माझ्या तोंडून निघालेलं आहे आणि याची मला जाणीव झालेली आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. कारण मी मुळातच फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची गायिका असल्यामुळं मी महिलांचा सन्मान करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार माझ्यावर आहेत. पण दुर्देवानं माझ्या बोलण्यातली भावना, तळमळ, माझी पोडतिडक हे न बघता भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ, नवनीत राणा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या माझ्यावर तुटून पडल्या. पण मला त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्हाला जर कोणा महिलेबद्दल इतक प्रेम असेल तर तुम्ही लातूरचं प्रकरण असेल, मालेगावचं प्रकरण असेल तसंच महाराष्ट्रात विविध ठिकाणी महिला अत्याचाराबाबत ज्या घटना घडत आहेत तिथं तुमचा आक्रमकपणा दाखवा. पण तुम्ही तसं करत नाहीत याचं कारण माझ्या लक्षात आलं आहे की, या जातीयवाद करत आहेत. कारण जिथं खरोखरंच अशा घडत आहेत तिथं त्या बोलत नाहीत. पण मी केवळ बोलले तर त्या माझ्यावर तुटून पडल्या कारण मी एक दलित समाजातून आलेली गायिका आहे. मला त्यांना उद्ध्वस्त करायचं आहे. यांनी मला टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे. इतकंच नव्हे तर कालपासून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला धमक्या दिलेल्या आहेत की, जे तू आमच्या मंत्र्याच्या पत्नीबद्दल बोललीस ते आम्ही तुझ्यासोबत भर चौकात करु. तसंच तुझं घर उद्ध्वस्त करु, इतकंच नव्हे तर तुझा मर्डर करु अशा धमक्याही मला फोनवरुन दिल्या आहेत. त्यामुळं मी माझा फोनही स्विचऑफ करुन ठेवला आहे.

Amruta Fadnavis_Anjali Bharati
Maharashtra elections: मोठी बातमी : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखा बदलल्या; आता 'या' तारखेला होणार मतदान

चुकीची असेल तर फाशी द्या

मी मरणाला भीत नाही पण तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की मी चुकीची आहे तर मला फाशीची शिक्षा द्या, मला ती मंजूर आहे. पण माझा आवाज दाबण्याचं काम जर तुम्ही करणार असाल तर जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत माझा आवाज दबणार नाही. तुम्ही माझ्यावर केस करा, माझे प्रोग्राम बंद करा? पण तरीही माझा आवाज बंद होणार नाही. जिथं-जिथं महिलांवर अन्याय अत्याचार होतील तिथं-तिथं ही अंजली भारती उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात जर माझं काही बरं वाईट झालं तर त्याला हेच धमक्या देणारे जबाबदार असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com