Manoj Jarange protest : : जरांगेंच्या मागणीवर एकच उपाय; नाना पटोले यांना दिला महायुती सरकारला 'हा' सल्ला

Nana Patole advice News : आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी विविध अटी व शर्ती टाकल्या जात आहेत. जरांगे यांना फक्त एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ती त्यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे परिस्थिती चिघळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nana Patole & Manoj Jarange
Nana Patole & Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या जरांगे पाटील यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावे, सोबतच सरकारनेही त्यांच्याशी बोलले पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिला. यावेळी त्यांनी जातिनिहाय जनगणना हाच आरक्षणाच्या संघर्षावर एकमेव उपाय असल्याचे सांगितले.

जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या यापूर्वीच आंदोलनाचा इतिहास बघता सरकारने सावध भूमिका घेतली आहे. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडून नये याची खबरदारी घेतली जात आहे. आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी विविध अटी व शर्ती टाकल्या जात आहेत. जरांगे यांना फक्त एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ती त्यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे परिस्थिती चिघळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Nana Patole & Manoj Jarange
BJP Vs Shivsena UBT Politics: प्राणघातक हल्ल्यातील युवक चिंताजनक, भाजप नेते उद्धव निमसे यांची अटक पूर्व जामीनासाठी धाव!

या परिस्थितीवर मत व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले, सरकारने दोन पावले पुढे जाऊन जरांगे यांच्या सोबत चर्चा करावी. सध्या गणेशोत्सवाचा सण सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. आंदोलनाची झळ लोकांना बसू शकते. त्यामुळे सरकारने स्वतः पुढाकार घेऊन जरांगे मुंबईत दाखल होण्यापूर्वी त्यांच्याशी बोलावे. भाजपचा खोटारडेपणा संपूर्ण देश बघत आहे.

Nana Patole & Manoj Jarange
Raj Thakeray : राज ठाकरे हे फडणवीस, शिंदेंना झटका अन् काँग्रेस, पवारांना सुखद धक्का देतील?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजवर अनेक घोषणा केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी मात्र केली जात नाही. त्यामुळे भाजप सरकारवर कोणाचा विश्वास नाही. ओबीसी समाजालाही त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळत नाही. देशाचा पंतप्रधान ओबीसी असताना ओबीसी समाजाला न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे. कोणाला कोणाच्या हिश्शातून आरक्षण देण्याची गरज नाही, असे स्पष्ट करताना नाना पटोले (Nana Patole) यांनी हा प्रश्न कायमचा सोडवायचा असले तर जातनिहाय जनगणना केली पाहिजे असे सांगितले.

Nana Patole & Manoj Jarange
Uddhav- Raj Thackeray : उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार! निमंत्रण मिळालं, कारणही आहे खास!

आम्ही सत्तेत नाही म्हणून हे बोलत नाही. आमची आधीपासूनच ही भूमिका आहे. काँग्रेसच्या (Congress) मागणीनंतर मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचे घोषित केले आहे. मात्र त्याची प्रक्रिया अद्यापही सुरू केली नसल्याची टीका पटोले यांनी केली.

Nana Patole & Manoj Jarange
Shivsena News : गणरायाचे आगमन, पण राजकारण्यांची कुरघोडी सुरूच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com