Uddhav Thackeray Raj Thackeray
Uddhav Thackeray Raj Thackeray Sarkarnama

Uddhav- Raj Thackeray : उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार! निमंत्रण मिळालं, कारणही आहे खास!

Uddhav Thackeray Raj Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होणार आहे. उद्धव ठाकरे सहपरिवार 'शिवतीर्थ' येथे जाणार आहेत.
Published on

Thackeray Brothers : मराठीच्या मुद्यावर आलेल्या ठाकरे बंधुंची युती होणार अशी चर्चा आहे. दोघांनी देखील तसे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जात राज ठाकरेंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आता, उद्धव ठाकरे हे सहपरिवार राज ठाकरेंचे निवास्थान 'शिवतीर्थ'येथे जाणार आहेत.

दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी फोन करत गणेशोत्सवात गणपतीच्या दर्शनसाठी येण्याचे निमंत्रण उद्धव ठाकरेंना दिले होते. ते निमंत्रण उद्धव ठाकरेंनी स्वीकारल्याची माहिती असून ते सहपरिवार राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहे.

हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यादांच एका मंचावर आले होते. त्यामुळे आगामी महापालिकेत त्यांची ही युती होणार का? अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, ठाकरे बंधुंनी आलं ठरलं असल्याचे सांगत यावर उघड बोलण्याचे टाळले होते.

Uddhav Thackeray Raj Thackeray
12 कोटींची कॅश अन् किलोंमध्ये दागिने; ईडीच्या छाप्यात घरात कोट्यवधींचं घबाड सापडलेले काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र यांची हिस्ट्री

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसा दिवशी राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार असल्याने महापालिकेत दोन्ही भावांची युती होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

राज ठाकरे हे तब्बल सहा वर्षानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना देण्यासाठी गेले होते. त्या आधी ते अमित ठाकरेंच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पहिल्यांदाच जाणार आहेत.

Uddhav Thackeray Raj Thackeray
Religious Structure Demolition : धार्मिक स्थळावर पहाटचं 'जेसीबी' फिरवला; तीन संशयित ताब्यात, 'SRPF'च्या तुकड्यांसह अख्खा शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त शहरात उतरवला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com