Hansraj Ahir News : "...म्हणून 'त्या' कंपनीला संपूर्ण राज्यात काळ्या यादीत टाका!" ; हंसराज अहिर संतापले

Chandrapur Political News : कंत्राटदार भाजपचा जिल्हाध्यक्ष...
Hansraj Ahir News :
Hansraj Ahir News :Sarkarnama

संदीप रायपूरे

Chandrapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील महत्वकांक्षी योजना अमृतजल योजनेकडे पाहिले जाते. या योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेने परभणी येथील एका संतोष कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिले गेले होते. मात्र, या योजनेत आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल 240 कोटी रूपयांच्या या योजनेचे बिल काम पूर्ण होण्यापूर्वीच संबंधित कंत्राटदार कंपनीला अदा करण्यात आले आहे. याचवरुन आता राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर या योजनेसंबंधित कंत्राटदार कंपनीला संपूर्ण राज्यात काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर(Hansraj Ahir) यांनी चंद्रपूर येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी महापालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नियोजन शून्य कामावर तीव्र नाराजी बोलून दाखवली. चंद्रपूरकरिता या योजनेसाठी 240 कोटी रूपयाचे कंत्राट दिले गेले.

Hansraj Ahir News :
NCP Leader Attened Congress Metting : काँग्रेसच्या गोपनीय बैठकीला राष्ट्रवादी नेत्याची हजेरी; अकोल्यात खळबळ

अमृतजल पाणी पुरवठा योजना ही 2021 पर्यत पूर्ण करावयाची होती. पण या कालावधीत काम पूर्ण झाले नाही. योजनेचे काम पूर्ण न झाल्याने महानगरपालिकेत अंतर्गत मोडणाऱ्या नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागले, असे असताना कंत्राटदाराला बिल अदा करण्यात आले. ही गंभीर बाब समोर येताच अहिर प्रचंड संतापले. 240 कोटी रूपये खर्चुनदेखील जरी महानगरवासियांना पाणी मिळत नसेल तर काय म्हणावे असे अहिर यांनी सांगितले.

नुकतीच शासकीय विश्रामगृहात महापालीका व जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची समीक्षा बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त विपीन पालिवाल,कार्यकारी अभियंता संजय अगस्ती, माजी महापौर अंजली धोटेकर, भाजप(BJP) नेते खुशाल बोंडे ,माजी उपमहापौर अनील फुलझेले उपस्थित होते. काम पुर्ण न करता बिल दिले कसे असा संतापजनक सवाल यावेळी उपस्थित केला. सोबतच दोषी कन्स्ट्रक्शन कंपनी व मालकाला संपुर्ण राज्यातून काळया यादीत टाकण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कंत्राटदार भाजपचा जिल्हाध्यक्ष...

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या स्वप्नातील अमृतजल योजना राबवण्यासाठी परभणी येथील संतोष कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट देण्यात आले. कंपनीचे मालक संतोेष मुरकुटे हे परभणी जिल्हा भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत.दोन वर्ष लोटूनही काम अपूर्णच राहिल्याने महानगरवासियांत संताप आहे.विशेष म्हणजे तब्बल साडेसात वर्ष चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Hansraj Ahir News :
MNS Vs BJP News : मुंबई - गोवा महामार्गावरून राजकारण तापलं; 'चमकोमॅन' उल्लेख करत 'या' मनसे नेत्याने मंत्री चव्हाणांंना डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com