Vijay Wadettiwar Video : 'आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा', व्हिडिओ दाखवत विजय वडेट्टीवारांनी दिला पुरावा, म्हणाले, पोलिसांवर गुन्हे...

Vijay Wadettiwar Criticized Suresh Dhas : भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर आता माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाना साधला आहे. धस यांच्या भाषणाचा व्हिडिओ दाखवत गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Suresh Dhas
Suresh Dhas sarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar Video : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करणारे आणि त्यांचे घोटाळे उघडकीस आणणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर आता माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाना साधला आहे. धस दुटप्पी आहे, असा आरोपही वडेट्टीवारांनी यांनी करत धश यांचा व्हिडिओच ट्विट केला आहे.

पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याच मृत्यू झाला आहे. पोलिस कारवाईचे तो आपल्या मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत होता. म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या विरोधात सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार सुरेश धस सहभागी झाले होते. मात्र दुसरीकडे त्यांनी पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.

Suresh Dhas
MP Vishal Patil : काँग्रेस नेतेच जयंत पाटलांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येणार, खासदार विशाल पाटलांनीच दिले संकेत

सुरेश धस हे पोलिसांवर गुन्हे दाखल करून नका, असे म्हणत असल्याचा व्हिडिओ विजय विडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. तसेच भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा. एकीकडे सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यात सुरेश धस सहभागी होतात. आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका..भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे? सोमनाथ सुर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाही का? असा सवाल केला आहे.

एका आईने आपला मुलगा आणि कुटुंबाने आधार गमावला आणि पोलिसांना फक्त तंबी देऊन सोडून द्यायचे हा कुठला न्याय, असे देखील वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सुरेश धस यांना परभणी प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय का मिळू द्यायचा नाही का? अशी विचारणाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

सरपंच देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मुंडे यांचे नाव न घेता आमदार धस 'आका' असा उल्लेख करून त्यांच्यावर निशाना साधत असतात. सरपंच देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीत मृत्य एकचवेळी झाली होती. मुंडे मंत्री असल्याने त्यांचे प्रकरण मीडियाने चांगलेच उचलून धरले होते. या धुरळ्यात सूर्यवंशीचा मृत्यूची फारशी चर्चा झाली नाही. मात्र, धस यांनी पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका, असे म्हणत असल्याने त्यांच्या हेतुवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे.

Suresh Dhas
Police Strict Action: जिल्हा पोलिस प्रमुखांनी केली कान उघाडणी, अन् खाकी झाली जागी; अंमली पदार्थ कारवाईचा धडका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com