Police Strict Action: जिल्हा पोलिस प्रमुखांनी केली कान उघाडणी, अन् खाकी झाली जागी; अंमली पदार्थ कारवाईचा धडका

District Police Chief News : अंमली पदार्थांच्या विरोधात जिल्हा पोलीस दलाने तातडीची पावले उचलत गेल्या सहा दिवसात जवळपास 9 लाखांचा गांजा जप्त केला.
police
police Sarkarnama
Published on
Updated on

Kolahapur News : गेल्या अनेक वर्षांपासून अंमली पदार्थाच्या कारवाईला उदासीनता दाखवणारी जिल्हा पोलीस यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी आदेश देताच खाकी जागी झाली आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात जिल्हा पोलीस दलाने तातडीची पावले उचलत गेल्या सहा दिवसात जवळपास 9 लाखांचा गांजा जप्त केला. वर्षभरात जवळपास 97 लाख रुपयांचे अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांकडून (Police) सुरू असलेल्या कारवाईचं नागरिकांकडून खास करून महिला वर्गांकडून स्वागत होत आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात गांजाची कारवाई होत असताना यापूर्वी पोलीस प्रशासन गप्प का होते? हेतू परस्पर कारवाई थांबवली होती का? अशा चर्चा आता जोर धरू लागली आहे.

police
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचे पाय खोलात ! मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी स्वपक्षातूनच वाढला दबाव ?

जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी प्रभारी अधिकाऱ्यांची कान उघाडणी करत जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अधीक्षकांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील मागील सहा दिवसात जवळपास 60 पेक्षा अधिक धडक कारवाया केल्या आहेत.

यामध्ये आतापर्यंत 77 जणांना ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईंमधील गांजाचा पुरवठा करणाऱ्या पाच जणांना बेड्या ठोकल्याने जिल्ह्यात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. गांजाचे प्रमाण वाढल्याची माहिती नियोजन बैठकीत देण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या सूचना दिल्या होत्या.

police
Pankaja Munde : पंकजा मुंडें वेगळा पक्ष काढणार? संजय राऊतांनीही दिल्या शुभेच्छा म्हणाले, 'त्यांनी स्वत: पुढाकार घ्यावा...'

स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) शाखेकडून गेल्या काही दिवसांमध्ये 91 किलोचा गांजा पकडून गांजा पुरवठा करणाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर या कारवाईला गती मिळाली. दरम्यान गांजा पुरवठा करणारा मुख्य सूत्रधार हा मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यालाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

police
Pankaja Munde Politics : माझ्या बाबांचा गणपती दूध पित नव्हता! पंकजा मुंडेंचं सूचक विधान...

दरम्यान, वर्षभराची अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाईचे चित्र पाहता मागील वर्षात जवळपास पोलिसांनी 97 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या वर्षभरात 205 किलो गांजा, 45 ग्रॅम चरस, 41 किलो अफू, 133 ग्रॅम कोकेन, 64 ग्रॅम एम. डी असा 97 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

police
AAP crisis : दिल्लीतील पराभवानंतर आपचा 'तो' नेता एकनाथ शिंदेंच्या मार्गाने जाऊ शकतो; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com