BJP Blue Print : भाजपची ब्ल्यू प्रिंट कधी येणार? सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं

Sudhir Mungantiwar : लोकसभेतील पराभवानंतर भाजपला आता ब्ल्यू प्रिंटची गरज भासू लागली आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

राजेश चरपे

Nagpur Political News : भाजपने लोकसभा निवडणुकीचा पराभवाचा चांगलाच धसका घेतला आहे. महाविकास आघाडीला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे ठरवण्यात आले आहे. चिंतन बैठकीत यावर चर्चा झाली. यावर राज्याचे वननंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, एका बैठकीत ब्लू प्रिंट तयार होत नसते. मात्र भविष्यात ती नक्की येईल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे Raj Thacharay यांनीसुद्धा राज्याच्या विकासाठी एक ब्ल्यू प्रिंट तयार केली होती. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच दिवशी भाजप-सेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याने ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंट दुर्लक्षित झाली. त्यानंतर राज ठाकरे हे कधीच या भानगडीत पडले नाही.

लोकसभेतील पराभवानंतर भाजपला आता ब्ल्यू प्रिंटची गरज भासू लागली आहे. यावर सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar म्हणाले, राज्यातील जनतेला उत्तम योजना दिल्या पाहिजे. हे महायुती सरकारचे कर्तव्य आहे. मंथन बैठकीत लोकसभेतील पराभवाचे विश्लेषण करताना ज्या उणिवा आढळल्या दूर केल्या जाणार आहेत. महाविकास आघाडीने केलेल्या खोट्या प्राचारावरही चर्चा झाली. महाराष्ट्राच्या हितासाठी महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने मंथन करण्यात आले.

महाराष्ट्राच्या हितासाठी महायुतीचे सरकार येणं गरजेचं आहे त्या दृष्टीने चर्चा झाली. जाती-जातीत तेढ निर्माण होणे, दुरावा निर्माण होणे हे राज्यासाठी चिंतेची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून अठरापगड जातीची आपण भाषा करतो. एक सूर, एक विचार, एकीचा भाव जास्त महत्त्वाचा आहे. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Sudhir Mungantiwar
Rekha Thakur : अमोल मिटकरींच्या ऑफरला 'वंचित'चं उत्तर; 'आधी भाजपची साथ सोडा...'

जरांगे पाटील Manoj Jarange कधी कधी अनावश्यक शब्दांचा वापर करतात. त्यावर प्रतिक्रिया द्यावी असे वाटत नाही. चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावाने अधिकाऱ्याच्या कानशिलात लागवलेला व्हीडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावर मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही. जनतेनेचे यावर सर्वार्थाने प्रतिक्रिया द्यावी असेही मुनगंटीवार म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Sudhir Mungantiwar
Nitin Raut : नितीन राऊतांचा अनोखा दौरा; थेट आयुक्तांनाच नागपूरची दुर्दशा दाखवली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com