

Nagpur News : राज्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यानी राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकार कशी मदत करणार? असा सवाल करीत केंद्र सरकारला कोणता प्रस्ताव सादर केला आहे, त्याची माहिती अधिवेशनाच्या पटलावर ठेवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी चौथा दिवस आहे. अधिवेशनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी दुपारी मुंबईवरून विधिमंडळात दाखल झाले. विधिमंडळात दाखल होताच त्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी ठाकरे यांच्या त्यानंतर विधिमंडळ पक्ष कार्यालयातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे यांचं शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, सुनील राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. विदर्भसाठी या आधिवेशनात काय दिले? असा सवाल विचारत राज्य सरकारला धारेवर धरले. राज्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यानी मदतीसाठी मोठ्या पँकेजची घोषणा केली आहे. केंद्राकडे मदत मागितली आहे. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारच्या कारभारवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत काहीही नियम असू वा नसू, हे पद द्यायला सरकार कुणाला घाबरतेय, असा सवाल त्यांनी केला. उपमुख्यमंत्रिपद घटनात्मक नसताना दोन आहेत. मग विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय का घेतला जात नाही, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.
त्यासोबतच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटाने पिचला असताना त्याला मदत केली जात नसल्याबद्दल त्यांनी धारेवर धरले. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलाना 2100 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पाळले नाही तर शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जात नसल्याबद्दल राज्य सरकारच्या कारभारावर त्यांनी टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.