Bachchu Kadu : बच्चू कडूंनी विरोधकांचा 'गेम पलटवला'; आता 'कुटनीती' खेळणार

Supreme Court Bachchu Kadu Amravati District Co operative Bank : अमरावती जिल्हा सहकारी बँकेत बच्चू कडू यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावाविरुद्ध न्यायालयात धाव.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Amravati Politics : अमरावती जिल्हा सहकारी बँकेत बच्चू कडू आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. बच्चू कडू यांचा आमदारकीच्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्यांना घेरण्यासाठी विरोधक वेगवेगळ्या प्रकाराचे डावपेच खेळत आहेत.

एकमेकांची जिरवाजिरवी करण्यात वेगवेगळे डावपेच खेळले जात आहे. राजकीय डावपेचाची ही लढाई आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचली होती. त्यात दिलासा मिळाल्याने बच्चू कडू विरोधकांविरोधात आक्रमक झाले आहेत.

बच्चू कडू (Bachchu Kadu) अमरावती जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. या बँकेत त्यांचे पाच संचालक आहेत. विधानसभा निवडणुकीतील बच्चू कडू यांच्या पराभवानंतर त्यांना विरोधक वेगवेगळे डावपेच टाकून नामोहरण करत आहेत. यातून बच्चू कडू आणि विरोधकांमध्ये संघर्ष उफाळला आहे.

Bacchu Kadu
Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंचा मेव्हणा तडीपार; छगन भुजबळ म्हणाले, 'कठीण समस्या आहे, ...तर कडक कारवाई होणारच!'

बच्चू कडू यांच्या पाच संचालकांना अपात्र करण्याचा ठराव झाला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. तिथून पुढे सर्वोच्च न्यायालयात (Court) पोचले. सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास ठरावाला स्थगिती दिली. यावर बच्चू कडू यांनी आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत आहे. ही लढाई आम्ही जिंकली आहे. आता अपात्र होण्याचे कुठलही कारण उरत नाही, असे म्हटले आहे.

Bacchu Kadu
BJP Membership Registration : भाजप सदस्य नोंदणी वादाच्या भोवऱ्यात; पार्कमध्ये फ्री एन्ट्रीचे आमिष चर्चेत

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयापूर्वी विभागीय सहनिंबधकांनी बच्चू कडू यांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. बच्चू कडू यांना 2017 मध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि मारहाण केल्याच्या गुन्ह्यात विशेष न्यायालयाने एक वर्षांपर्यंत कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड आणि 11 संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल केली आहे.

बच्चू कडूंच्या संचालकांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असताना, आता विरोधकांनी वरील मुद्यांवरून त्यांचीच अपात्रतेची मागणी केली आहे. यासाठी सहनिबंधकांकडे याचिका दाखल असून त्यावर 24 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता साक्ष नोंदविण्याकरिता समक्ष अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहण्याची नोटीस काढली आहे. यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणी कायम आहेत.

विरोधकांच्या या मुद्यावर बच्चू कडू आक्रमक आहे. भाजप अन् काँग्रेसला लक्ष्य केले आहे. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना अशा प्रकारच्या नोटीस येतात, असे म्हणत राजकीय संघर्ष कायम ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे. विरोधक एकाटवले असले, तरी त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी बच्चू कडू यांनी सुरू केली आहे. विरोधकांना हेरण्यासाठी बच्चू कडू कोणता राजकीय डाव टाकतात याकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com