Ganesh Naik: ताडोबाच्या 'कारभारा'वर ED छापा; वनमंत्री म्हणाले, 'काहीतरी काळेबेरे...'

Tadoba Jungle Safari ED Raid Forest Minister Ganesh Naik: न्यायालयाने गैरव्यवहाराची रक्कम जमा करण्याचे आदेश ठाकूर भावंडांना दिले आहे. यापैकी ४१ लाख रुपये जमा करण्यात आले असून तीन कोटी रुपये जमा करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत मागितली आहे.
Tadoba Jungle Safari ED Raid
Tadoba Jungle Safari ED Raid Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: ताडोब्यातील जंगल सफारीच्या कंत्राटदारावर ईडीने (ED)छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. अभयारण्याच्या जंगल सफारीत कोणी कोट्यवधीचा पैसा कमावत असले आणि त्यावर ईडी छापा टाकत असेल तर काहीतरी नक्कीच काळेबेरे आणि शंकास्पद आहे. ताडोबाच्या नावावर काही दुसरे उद्योग तर येथे चालत नाही ना अशी शंका राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली. मात्र याबाबत आपणास काही माहीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ताडोबा जंगल सफारी ऑन लाईन बुकींगचे कंत्राट वाईल्ड कनेक्टिव्हीटी सोलुशन कंपनीला दिले आहे. या कंपनीने बुकींगच्या नावावर १२ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. कंपनीचे संचालक अभिषेक विनोद ठाकूर आणि रोहित विनोद ठाकूर या भावंडाच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. या गैरव्यवहावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Tadoba Jungle Safari ED Raid
Pune Police : वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची तक्रार घेऊन आमदार पोहोचले पोलीस आयुक्तालयात! नेमकं काय घडलं...

न्यायालयाने गैरव्यवहाराची रक्कम जमा करण्याचे आदेश ठाकूर भावंडांना दिले आहे. यापैकी ४१ लाख रुपये जमा करण्यात आले असून तीन कोटी रुपये जमा करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत मागितली आहे. तत्पूर्वी ईडीने छापा टाकल्याने आता वेगळीच शंका निर्माण झाली आहे. वनमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गणेश नाईक प्रथमच नागपूरला आले असता त्यांनीही ताडोब्यात काही वेगळे प्रकार सुरू असावे, अशी शंका व्यक्त केली.

Tadoba Jungle Safari ED Raid
Kolhapur Guardian Minister: कोल्हापुरचा 'वस्ताद' कोण? मुश्रीफ की आबिटकर; रस्सीखेच सुरु...की तिसराच बाजी मारणार?

गोरेवाडा रेस्क्यु सेंटरला त्यांनी भेट दिली. या रेस्क्यु सेंटरमध्ये दोन वाघांना बर्ड फ्ल्यूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. कोंबडीच्या मटणातून वाघांना ही बाधा झाली की अन्य कशामुळे याची सत्यता तपासली जात असल्याचे त्यांनी सांगितले. वनामध्ये अतिक्रमण केल्यानंतर मानव व वन्यजीव संघर्ष निर्माण होतो. अभयारण्यातील गावे व शेतांचे अधिग्रहण करण्याचे धोरण आखले आहे. पुढच्या काळात त्यात आणखी सुधारणा केली जाईल, असेही वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाची प्रशंसा गणेश नाईक यांनी केली. त्यांनी कोट्यवधींची झाडे लावून वनाचे संवर्धन केले आहे. सध्या वनविभागात डीएफओ आणि मजुरांची कमतरता आहे. याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून काही जागा भरल्या जातील तसेच यंत्रसामुग्री घेतली जाईल, असेही गणेश नाईक यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com