Pune Police : वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची तक्रार घेऊन आमदार पोहोचले पोलीस आयुक्तालयात! नेमकं काय घडलं...

MLA Hemant Rasane complaint DCP Sandeep Singh Gill : आपली वस्ती भाग सोडून नागरी भागामध्ये येणाऱ्या या महिलांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचं हेमंत रासने यांनी सांगितलं.
Police
PoliceSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या तुळशीबाग तसेच छत्रपती शिवाजी रस्ता परिसरात नागरिकांची कायम वर्दळ असते. याच परिसरात असणाऱ्या बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला मुख्य बाजारपेठेच्या भागामध्ये येऊन थांबत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांकडून आणि व्यापाऱ्याकडून करण्यात येत आहे.

पार्श्वभूमीवर कसबा पेठ मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेमंत रासने म्हणाले, बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला गेली काही दिवसांपासून तुळशीबाग, मंडई तसेच मुख्य शिवाजी रस्त्यावर उभ्या राहत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे परिसरामध्ये राहणारे रहिवाशी विशेषतः महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याच्या तक्रारी अनेकांनी माझ्याकडे केले आहेत.

Police
Delhi Elections 2025: भाजप, आप, काँग्रेसला ओवेसी, मायवतींचे टेन्शन; मुस्लिम, दलित मतांचा दिल्लीत किती परिणाम होणार

त्यामुळे बेकायदेशीरपणे आपली वस्ती भाग सोडून नागरी भागामध्ये येणाऱ्या या महिलांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचं हेमंत रासने यांनी सांगितलं.सदाशिव, शनिवार तसेच नारायण पेठेत मोठ्या संख्येने अभ्यासिका असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे राज्यभरातील विद्यार्थी येथे आहेत.

परीक्षांचे निकाल, वाढदिवस तसेच इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांकडून हुल्लडबाजी करत गोंधळ घालण्याचे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत असल्याची तक्रार येत असल्याचं देखील आमदार रासने यांनी यावेळी सांगितलं आहे.परिसरात शांतता राहण्यासाठी पोलिसांनी योग्य ती समज संबंधितांना देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com