Nagpur News: ठाणे शासकीय रुग्णालयातील 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात कारवाईची घोषणा केली होती, मात्र चार महिन्यांनी देखील कारवाई न झाल्याने सदस्य आक्रमक झाले होते. त्यामुळे या प्रकरणी दोषी आढळलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आजच कारवाई केली जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत दिले. आरोग्यमंत्री अनुपस्थित असल्याने सामंत यांनी सरकारच्या वतीने उत्तर देताना ही माहिती दिली.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. याबाबत ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब आणि अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. परब यांनी अतिशय आक्रमकपणे मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने ठाणे रुग्णालयातील दोषींवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला.
या घटनेबाबत झालेल्या चौकशीचा अहवाल गोपनीय कसा? चौकशीची घोषणा झाल्यावर तो प्रश्न सभागृहाची प्रॉपर्टी होते. यामध्ये काही राजकीय लागेबांधे देखील आहेत. या रुग्णालयात अनेक त्रुटी आहेत. अशी घटना नांदेडला देखील झाली होती. त्याबाबत शासना कारवाई का करीत नाही, अशी विचारणा त्यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी निरंजन डावखरे यांनी देखील या रुग्णालयात अनेक त्रुटी आहेत. तेथे पुरेसे कर्मचारी नाहीत. त्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. रूग्णालयातील दोन डीन काढून टाकलेले आहेत. नियोजन चुकले. यातील दोषींवर कारवाई करायला हवी होती, याबाबत शासनाने काय केले, अशी विचारणा केली. सभागृहात आरोग्यमंत्री उपस्थित नसल्याने उदय सामंत यांनी सरकारच्या वतीने यावर खुलासा केला.
सामंत म्हणाले, या प्रकरणात एक सहाय्यक प्राध्यापक व एक व्याख्याता अनुपस्थित आढळले. त्यांच्यावर आजच्या आज कारवाई केली जाईल. या प्रकरणात महत्वाच्या काही बाबी तपासण्याची गरज आहे.
शनिवार, रविवारचा दिवस असल्याने रूग्णालयातील 18 पैकी 8 रुग्ण अत्यवस्थ स्थितीत खाजगी रुग्णालयातून दाखल झालेले होते. शासनाने हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. घटनेनंतर 145 पदांची भरती केल्याने येथे 193 कर्मचारी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
Edited By - Chaitanya Machale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.