Bhavana Gawali: शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींना दणका; आयकर विभागाची मोठी कारवाई

Income Tax Department: खासदार भावना गवळी यांना मोठा धक्का
Bhavana Gawali
Bhavana GawaliSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे. तब्बल 8 कोटी 26 लाखांचा टॅक्स थकवल्याप्रकरणी आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे खासदार भावना गवळी यांना मोठा धक्का बसला आहे.

या प्रकरणी'महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण'चे बँक खाते गोठवण्यात आले असून विश्वस्त आणि संचालकांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयकर विभागाने केलेल्या या कारवाईमुळे भावना गवळींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयकर विभागाने बजावलेल्या नोटीसीला समाधानकारक उत्तर न दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhavana Gawali
Ashok Chavan News: जनतेचा मोदींच्या नाही, तर काँग्रेसच्या गॅरंटीवर विश्वास; अशोक चव्हाणांचा दावा

आयकर विभागाकडून 29 डिसेंबरला भावना गवळींना नोटीस देण्यात आली होती. यानंतर पाच तारखेला त्यांना आपलं मत मांडायचं होतं. मात्र, त्या प्रत्यक्ष उपस्थित न राहता त्यांनी प्रतिनिधी पाठवत नोटीसला उत्तर दिलं. मात्र, आयकर विभागाला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने 8 कोटी 26 लाखांचा टॅक्स भरण्यासाठी अखेर खासदार गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवण्यात आली.

खासदार गवळी यांच्या संस्थेचे खाते गोठवण्यात आलेल्या वृत्तानंतर मात्र अद्याप त्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या कारवाईवर खासदार गवळी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तर काही महिन्यांपूर्वी भावना गवळी यांच्या काही संस्थेवरही ईडीची धाड पडली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून समन्स देखील बजावण्यात आले होते.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक जणांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले होते. यामध्ये वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी या देखील सहभागी होत्या. भावना गवळी यांच्या संस्थेवर झालेली ही कारवाई त्यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Bhavana Gawali
Kiran Mane In Shiv Sena : अभिनेते किरण मानेंची राजकीय इनिंग? ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com