Kiran Mane In Shiv Sena : अभिनेते किरण मानेंची राजकीय इनिंग? ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता...

Kiran Mane In Shiv Sena : किरण माने राजकारणातील 'बिग बॉस' होणार?
Kiran Mane In Shiv Sena :
Kiran Mane In Shiv Sena :Sarkarnama

Mumbai News : बिग बॉस फेम आणि 'मुलगी झाली हो' या मराठी टीव्ही मालिकेतून चर्चेत आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) आता आपल्या राजकीय इनिंगची सुरूवात करणार असल्याची चर्चा आहे. किरण माने आज शिवबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात माने आज प्रवेश करणार असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनेने दिले आहे. यामुळे अभिनयानंतर आता किरण माने राजकीय इनिंगसाठी सज्ज झाले असल्याची चर्चा आहे. (Latest Marathi News)

Kiran Mane In Shiv Sena :
NCP MLA Disqualification Timetable : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रसंदर्भातील वेळापत्रक जाहीर; कशी आहे प्रक्रिया?

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेते किरण माने त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. सत्ताविरोधी आणि भाजपविरोधी आपल्या घेत भुमिकेमुळे, आपल्याला मालिकेतून काढल्याचा आरोप माने यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यामुळे मराठी टिव्ही क्षेत्रात खळबळ उडाली होती. याबाबत मोठा वादही माध्यम आणि समाजमाध्यमात उमटला होता. आज ते ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सहकार्याने ठाकरे गटाच्या शिवबंधनात अडकणार आहेत.

Kiran Mane In Shiv Sena :
किरण माने उद्या कुणाची गुपितं उलगडणार ? म्हणाले, ''जिंकेन नायतर मरेन''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मातोश्रीवर पक्षप्रवेश -

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मातोश्रीवर अनेकांचा पक्षप्रवेश होणार आहे. बीडमधील वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) एक महत्त्वाचे पदाधिकारी निलेश जंगम हे देखील मनेसेचे अनेक कार्यकर्त्यांना घेऊन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यासोबतच अभिनेते किरण मानेंचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com