मोन्सेरातांच्या विजयाचा आनंद, पण उत्पलच्या पराभवाचा आनंद नाही; कारण...

उत्पल पर्रीकर (Utpal Parikar) पराभूत झाले, त्याचा आनंद मी साजरा करू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) गोव्यातील निकालानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले.
Devendra Fadanvis On Gao
Devendra Fadanvis On GaoSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : गोव्यात (Goa) २० जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्ष सर्वात (BJP) मोठा पक्ष ठरला आहे. येथे भाजपची सत्ता स्थापन होणार, यात यत्किंचितही शंका नाही. या निवडणुकीत बाबूश मोन्सेरात विजयी झाले, त्याचा निश्‍चितच आनंद आहे. पण उत्पल पर्रीकर पराभूत झाले, त्याचा आनंद मी साजरा करू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) गोव्यातील निकालानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले.

उत्पल पर्रीकर (Utpal Parikar) यांच्या विजयाचा आनंद यासाठी साजरा नाही करू शकत, कारण उत्पल आमच्या परिवारातीलच आहेत. त्यांनी त्यावेळी योग्य निर्णय घेतला असता, तर ते आज आमदार असते. पण दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. आता त्यांचे काय करायचे आहे, याचा विचार केला जाईल, असे फडणवीसांनी सांगितले. गोव्यात आम्ही डबल इंजीन लावून काम केले, त्यामुळे मोठा विजय येथे भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. बहुमत मिळत असले तरीही काही अपक्ष आमच्या सोबत येत आहेत. महाराष्ट्र गोमंतक पक्षालाही आम्ही सोबत घेणार आहोत, असेही ते म्हणाले.

सत्ता स्थापनेचा दावा आमचाच आहे, यात शंका नाही. पण दावा करण्यापूर्वी केंद्रीय पार्लीमेंट्री बोर्डाची मान्यता घ्यावी लागते. ती घेतल्यानंतरच आम्ही अधिकृत घोषणा करू शकू. बाबूश मोन्सेरात विजय होणार, हे पहिल्या दिवशीच ठरलेलं होतं. त्यांच्या विजयाचा आम्हाला विश्‍वास होता. त्यांच्या निवडीचा मला आनंद आहे. पण उत्पल पराभूत झाल्याचा आनंद मी करू शकत नाही. कारण ते आमच्या परिवारातील आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर ते आज आमदार राहिले असते.

Devendra Fadanvis On Gao
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार दाऊदच्या पाठीशी उभे आहे का?

गोव्यात २० जागा आमच्या पक्क्या आहेत. पण आम्ही ठरविले आहे की ३ अपक्षांना आम्ही सोबत घेऊ. मगोपलाही सोबत घेऊ आणि सत्ता स्थापन करू. गोव्याच्या नागरिकांचे मनापासून अभिनंदन आहे. या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यांनी देशात जो विश्‍वास निर्माण केला, त्याचा हा विजय आहे. आम्ही कोणत्या डीव्हीजनवर नाही, तर सकारात्मकतेवर निवडून आलो आहोत. प्रमोद सावंत हे आमचे मुख्यमंत्री सुद्धा निवडून आले आहेत.

‘ते’ मी पहिल्या दिवशीच सांगितले होते..

शिवसेनेची आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची लढाई आमच्याशी नाहीच, ती नोटाशी होती. हे मी पहिल्या दिवशीच सांगितले होते. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांनी मोठी सभा घेतली, तेथे त्यांच्या उमेदवाराला ९७ मते मिळाली. कॉंग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. परिवारवादी पक्षांना मोठा सेटबॅक या निवडणुकीच्या निकालांनी दिला आहे. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात ही निवडणूक आम्ही लढलो. महाराष्ट्रात २०२४ ची आमची तयारी झाली आहे. आम्ही निवडून येऊ. पण मधात सरकार पडले, तरीही आम्ही लढू आणि विजयी होऊ, असा विश्‍वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com