मेळाव्याच्या यशस्वितेवरून जिल्हा परिषदेतील सत्ताधारी, प्रशासनात श्रेयवादाची लढाई!

नागपूर (Nagpur) शहरातील मानकापूर येथील क्रीडा संकुल येथे महिला मेळावा व तीन दिवसीय विभागीय सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
Nagpur ZP
Nagpur ZPSarkarnama

नागपूर : सरस प्रदर्शनी व महिला मेळाव्याच्या यशस्वितेवरून जिल्हा परिषदेतील सत्ताधारी आणि प्रशासनात श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसून आले. प्रशासनाने शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तर सत्ताधाऱ्यांनी बचत गटातील महिला व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रदर्शनी सरस ठरल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

नागपूर (Nagpur) शहरातील मानकापूर येथील क्रीडा संकुल येथे महिला मेळावा व तीन दिवसीय विभागीय सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या आयोजनापासून दोघांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आहे. प्रदर्शनासाठी झेडपीचे (ZP) पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये बैठकांचे सत्र झाले असले तरी चार भिंतीच्या बाहेर निघताच एकमताने त्यावर अमल झाल्याचे दिसून आले नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे व इतर पदाधिकाऱ्यांना पत्रकार परिषदेतून मेळावा व प्रदर्शनाची माहिती दिल्यावर सीईओ योगेश कुंभेजकर यांनी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्याची वेगळी माहिती दिली.

सीईओंनी पदाधिकाऱ्यांसोबत राहणेदेखील टाळल्याची चर्चा आहे. सरस प्रदर्शनामध्ये येण्याचे आवाहन पदाधिकारी व प्रशासनाकडून स्वतंत्रपणे करण्यात आले. प्रशासनाने यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर केला. ते करताना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचे दबक्या आवाजात कर्मचारी चर्चा करताना आढळले. दोघांमधील समन्वयाचा अभाव व श्रेयवादामुळे प्रदर्शनात अनेक त्रुटी राहिल्याचे कर्मचारी सांगतात. संपूर्ण व्यवस्था जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे होती. परंतु त्यांनी नुसताच काम करण्याचा देखावा केला. महिला बचत गटांना अपेक्षित असलेल्या समस्या सोडविण्यात त्यांना अपयश आल्याचे चित्र होते.

Nagpur ZP
जिल्हा परिषद अध्यक्षपदही ओबीसीसाठी आरक्षित नसेल !

६७ लाखांची विक्री..

या प्रदर्शनात १५० महिलांचे स्टॉल होते. महिला बचत गटांसाठी ही प्रदर्शनी असली तरी पुरुषांनाही स्टॉल देण्यात आले होते. त्यांच्याकडून मालाची विक्री करण्यात आली. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात ६७ लाखांच्या मालाची विक्री झाल्याची नोंद करण्यात आली.

माजी सीईओ यादवांची आठवण..

वर्ष २०१९ ला सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी करण्यात आलेले नियोजन हे आताच्यापेक्षा अधिक चांगले होते, असे म्हणत अनेकांना तत्कालीन सीईओ संजय यादव याचा आठवण झाली. त्यावेळी आठ ते दहा दिवसांची सरस प्रदर्शनी होती. महिलांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. बचत गटांचा संपूर्ण माल संपला होता. महिलांनी जिल्हा परिषदेचे आभार मानले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com