Sunil Kedar : लोकसभेनंतर सुनील केदार यांच्या समर्थकांना लागले विधानसभेचे वेध, कोणाला संधी मिळणार?

Congress Leader Sunil Kedar Ready For Assembly Elections : लोकसभा निवडणुकीतील विजयाने केदार यांचा निर्णय योग्य ठरला आहे. विधानसभेसाठी उपाध्यक्ष कुंदा राऊत, महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे आणि समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे यांच्या नावाची सध्या जोरात चर्चा आहे.
Sunil Kedar
Sunil KedarSarkarnama

Nagpur News, 12 June : रामटेक लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीला जिंकून दिल्याने माजी मंत्री सुनील केदार यांचे समर्थक जिल्हा परिषदेच्या सभापतींना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच जिल्हा परिषदेत सभापतींची निवडणूक करण्यात आली आहे. हे बघता आगामी विधानसभा निवडणुकीत कुठल्या सभापतींना संधी मिळणार याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत रामटेकमध्ये काँग्रेसला (Congress) पराभव स्वीकारावा लागला होता. शिवसेनेच कृपाल तुमाने यांनी मोठ्या फरकाने काँग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांचा पराभव केला होता. यावेळी काँग्रेसने विजय खेचून आणला. यात माजी मंत्री सुनील केदार यांचा सिंहाचा वाटा आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता आली तेव्हापासूनच त्यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती. जिल्हा परिषदेत दुसऱ्या टप्प्यात पदाधिकाऱ्यांची निवड करतानाच लोकसभा टार्गेट ठेवण्यात आले होते. त्यानुसारच सर्व सहा विधानसभा मतदार संघातून एक सभापती निवडण्यात आला होता.

Sunil Kedar
Sharad Pawar On Narendra Modi : सत्ता डोक्यात घुसली की मोदींची गॅरंटी चालत नाही,पवारांची मोदींवर टीका !

लोकसभा निवडणुकीतील विजयाने केदार यांचा (Sunil Kedar) निर्णय योग्य ठरला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उपाध्यक्ष कुंदा राऊत, महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे आणि समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे यांच्या नावाची सध्या जोरात चर्चा आहे. या तीन पैकी एक, दोन जणांना विधानसभेत संधी मिळण्याची शक्यता आहे. कुंदा राऊत यापूर्वीच हिंगणा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढल्या आहेत. त्यांना पुन्हा तयारी करण्याचे सांगण्यात आले आहे.

हा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. कामठी विधानसभा मतदारसंघासाठी अवंतिका लेकुरवाळे इच्छुक आहेत. येथून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयरही स्पर्धेत आहेत. मागील निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांनी त्यांचा विजय हुकला होता.

Sunil Kedar
Congress : काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेते पद, राज्यसभेत काय गणित?

जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांचाही येथे दावा आहे. समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे उमरेड विधानसभा मतदारसंघातील आहेत. लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरेड मतदारसंघातून मिळालेली मते बघता त्यांचाही दावा भक्कम झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com