Video Nagpur : लोक चिडले भाजपच्या माजी नगरसेवकाला धो धो धुतलं; पोलिसांत तक्रार दाखल, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Nagpur Rain Viral Video BJP Ex-Corporator : संतप्त नागरिकांनी भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Nagpur BJP Ex-Corporator Viral Video
Nagpur BJP Ex-Corporator Viral VideoSarkarnama

Nagpur News, 18 June : राज्यासह देशभरात आता पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी पाऊस वाट बघायला लावत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला असला तरी शहरात राहणाऱ्यांनी मात्र नाकं मुरडली आहेत. कारण अचानक धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शहरात कामावरुन घरी जाणाऱ्या लोकांना पावसाचा जोरदार फटका बसतोय. तर कधी परिसरात पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र, नागपुरातून (Nagpur) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ती म्हणजे पावसाचं पाणी घरात शिरलं म्हणून संतप्त नागरिकांनी थेट माजी नगरसेवकाला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही विचित्र घटना नागपूरमधील हुडकेश्वर येथे घडली आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी मारहाण केलेला माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा (BJP) असून दीपक चौधरी असं त्यांचं नाव आहे. जुना सुभेदार भागात सिमेंट रोडचे काम सुरू असल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. यावरुन दीपक चौधारी आणि नागरिकांमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि नागरिकांनी चौधरी यांना मारहाण केली.

Nagpur BJP Ex-Corporator Viral Video
Dharashiva : अहो नाना आमच्याकडे पहा जरा, नेतृत्वहीन झालेल्या धाराशिव काँग्रेसला हवे बळ

या मारहाणीत दीपक चौधरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाण प्रकरणाची माहिती सांगताना चौधरी यांनी म्हणाले, मी माझ्या घराच्या मागे उभा असताना एक व्यक्ती धावत आला आणि मला दगड मारुन गेला. त्यामुळे माझं रक्त वाहू लागलं. डोळ्यांमध्येही रक्त येत होतं. दरम्यान, याप्रकरणी आता हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com