Dharashiva : अहो नाना आमच्याकडे पाहा जरा, नेतृत्वहीन झालेल्या धाराशिव काँग्रेसला हवे बळ

Nana Patole on Congress Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला नेतृत्व नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विपरीत परिस्थितीतही झटणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांच्या पाठीवर प्रदेश पातळीवरून थाप पडण्याची, त्यांना बळ मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना धाराशिव जिल्ह्याची आठवण येईल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Dharashiva News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला उल्लेखनीय यश मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. आता ती संख्या 14 वर पोहोचली आहे. दुसरीकडे, एकेकाळी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या धाराशिव जिल्ह्यात पक्ष नेतृत्वहीन झाला आहे. काँग्रेसची पडझड होत असताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन तरी धाराशिवकडे लक्ष देतील का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

गेल्या पंचवार्षिकमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण विजयी झाले होते. 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. सध्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने आधी जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व असायचे. आता तुळजापूरला भाजप, भूम-परंड्यात शिवसेना (शिंदे गट), धाराशिवला शिवसेना (ठाकरे गट) आणि उमरग्यात शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आहेत, उमरगा मतदारसंघ राखीव आहे. त्यानंतर सलग तीन टर्ममध्ये या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले. सलग तीनवेळा पराभव का झाला, याचा विचार काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवरून झाला नाही. दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील (मुरुमकर) यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मधुकरराव चव्हाण हे आता वयोमानानुसार थकले आहेत. त्यामुळे काँग्रेसला जिल्हास्तरीय नेतृत्वच राहिलेले नाही.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासारखे राज्यभरात प्रभाव असलेले नेते काँग्रेसकडे नाहीत. अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, वर्षा गायकवाड, नाना पटोले यांचा त्या त्या भागात प्रभाव आहे. नेत्यांच्या या फळीच्या जोरावर काँग्रेसने यश मिळवले. काँग्रेसला विस्ताराची मोठी संधी आहे. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आपल्या पक्षांच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या यशाच्या कौतुकात फारसे न अडकता शरद पवार बाहेर पडले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या ते जाणून घेत आहेत. काँग्रेसच्या बाबतीत असे होताना दिसत नाही.

धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था काय झाली आहे, याची माहिती तरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना असेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनीही लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे या मतदारसंघातून सव्वातीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले. ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली होती, हे काँग्रेसने लक्षात घ्यायला हवे. असे नसते तर बसवराज पाटील, सुनील चव्हाण यांच्या राहत्या गावांतून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले नसते. हे लक्षात घेऊन संघटनेच्या बांधणीसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Nana Patole
Raosaheb Danve News : ...म्हणून रावसाहेब दानवेंना त्यांच्याच मतदारसंघात दिसला पाकिस्तान!

विधानसभेची निवडणूक तीन-चार महिन्यांवर आली आहे. यासाठी सध्यातरी काँग्रेसची तयारी शून्य दिसत आहे. पूर्वीची स्थिती लक्षात घेतली तर महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष तुळजापूर मतदारसंघावर दावा करू शकतो. प्रभावी नेते नसतानाही लोकसभा निवडणुकीत तुळजापूरमधूनही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तब्बल 60 हजारांचे मताधिक्य मिळाले. अशीच परिस्थिती राहील, असे समजणे घाईचे ठरेल. त्यामुळे नेते, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी सक्रिय झाले पाहिजे. विपरित परिस्थितीतही जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते निष्ठेने काम करत आहेत. त्यांना प्रदेश पातळीवरून बळ मिळण्याची गरज निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com