
Solapur, 05 January : सोलापूर जिल्हा बॅंकेतील 238 कोटी 43 लाख रुपयांचे कर्जवाटप आणि बॅंकेच्या नुकसानीस जबाबदार धरून चौकशी अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी संचालकांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्याविरोधात संचालक मंडळांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सोलापूर दौरा विशेष महत्वाचा होता. या दौऱ्यात माजी अध्यक्ष राजन पाटील, दिलीप माने आणि दीपक साळुंखे यांनी सहकार मंत्री पाटील यांची भेट घेऊन बंद खोलीत केलेली चर्चा विशेष ठरली आहे.
याबाबत माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सोलापूर जिल्हा बॅंकेच्या वसुलीच्या नोटिशीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. त्या प्रकरणात सहकार मंत्री मेरीटवर निर्णय देतील, वशिलावर निर्णय देणार नाहीत, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
सिद्धेश्वर सहकारी बॅंकेचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आणि ब्रह्मदेवदादा माने बॅंकेच्या अंत्रोळीकरनगर शाखेच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) हे प्रथमच सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेतील 238 कोटी 43 लाख रुपयांचे कर्जवाटप आणि त्या नुकसानीस जबाबदार धरून चौकशी अधिकारी तोष्णीवाल यांनी जिल्ह्यातील बड्या नेत्यासंह ३३ जणांना वसुलीच्या नोटिशी दिल्या आहेत.
दरम्यान, बॅंकेच्या संचालकांनी त्या कारवाईविरोधात सहकार मंत्र्यांकडे अपिल केले आहे. त्यामुळे सहकार मंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्याला विशेष महत्व होते. सहकार मंत्र्यांचा सिद्धेश्वर बॅंकेचा कार्यक्रम संपल्यानंतनर माजी आमदार दिलीप माने यांच्या घरी स्नेहभोजन ठेवले होते. त्या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी गटनेते किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान उपस्थित होते.
जेवणानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राजन पाटील, दिलीप माने, दीपक साळुंखे यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. सहकार मंत्र्यांकडे असलेले अपिल आणि माने यांच्या निवासस्थानी झालेली ही बंद खोलीतील चर्चा विशेष चर्चेची ठरली आहे. यासंदर्भात राजन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हा बॅंकेच्या संदर्भात कोणीतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
राजन पाटील म्हणाले, सहकार मंत्री पाटील हे आमच्या पक्षाचे असून आमची सदिच्छा भेट होती. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांनी आणलेल्या सहकारातून राज्याची आणि देशाची प्रगती झाली. ही गोष्ट तरुणांच्या मनात रुजविण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या बरोबर राहून सहकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही काम करत राहणार आहोत.
डीडीसी बॅंकेच्या चौकशी अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या नोटिशीला आम्ही सहकार मंत्र्यांकडे, न्यायालयात आव्हान दिले आहे. आम्ही ती लढाई न्यायालयात लढू. चौकशी अधिकारी सुप्रिमो नाहीत. सहकार मंत्र्यांकडे आमचे वकिल बाजू मांडतील. तेही मेरिटवर निर्णय देतील, वशिल्यावर नाही, असेही राजन पाटील यांनी स्पष्ट केले. आम्ही सर्व एकच आहोत, हे सांगायलाही राजन पाटील विसरले नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.