वीज संघटनाचे काही गैरसमज आहेत, उद्या मुंबईत समोरासमोर बसून मिटवू...

ग्राहकांनी वीज बिल भरलं तर महावितरणवर आर्थिक संकट ओढवणार नाही. आम्ही या संकटातून नक्कीच बाहेर पडू असा विश्वास डॉ. राऊत (Nitin Raut) यांनी व्यक्त केला.
Dr. Nitin Raut
Dr. Nitin RautSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : महावितरण कंपनी आर्थिक संकटात असताना वीज कर्मचाऱ्यांनी राज्याला वेठीस धरू नये. संप तात्काळ मागे घ्यावा, अशी विनंती संघटनांना केली आहे. त्यांचे काही गैरसमज झाले आहेत. पण काळजीचे कारण नाही. उद्या मुंबईला समोरासमोर बसून त्यांचे गैरसमज मिटवू, असे ऊर्जामंत्री (Energy Minister) नितीन राऊत (Nitin Raut) आज येथे म्हणाले.

डॉ. राऊत म्हणाले, जवळपास 36 वीज कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेत सहभागी झाले. त्यांना संप मागे घेण्याची विनंती केली. वीज कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राला (Maharashtra) वेठीस धरू नये. सध्या उष्णता वाढली आहे, विजेची मागणीही वाढलेली आहे, दहावी-बारावीची परीक्षा ही सुरू आहे, शेतांमध्ये व पीक असल्याने सिंचनाची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत महावितरण आर्थिक संकटात असताना वीज कर्मचाऱ्यांनी राज्याला वेठीस धरू नये. तात्काळ संप मागे घ्यावा, अशी विनंती केली. उद्या समोरासमोर बसून मुंबईत चर्चा करू असेही त्यांना सांगितले आहे. कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

संघटना सकारात्मक विचार करतील...

कोणत्याही कंपनीचे खाजगीकरण अजिबात होणार नाही, ही खात्री मी त्यांना दिली आहे. वीज निर्मितीवर निश्‍चितपणे परिणाम होणार आहे. विजेचा ग्रीडवरही एखादा प्लांट बंद झाल्यावर परिणाम होऊ शकतो. एकलहरे वीज प्रकल्पातील दोन प्लांट बंद झाल्यामुळे नाशिक परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. कोळशाचे मोठे संकट आमच्यापुढे उभे ठाकले आहे. कृपया कोणत्याही संघटनेने राज्य सरकारला वेठीस धरू नये आणि विरोधकांना संधी उपलब्ध करून देऊ नये. एक पाऊल मी पुढे येतो एक पाऊल तुम्ही समोर या, असे त्यांना सांगितल्याचे ऊर्जामंत्री म्हणाले.

Dr. Nitin Raut
नितीन राऊत विलासरावांना विसरले नाहीत : त्यांच्या नावाने `वीजबिल अभय योजना`

वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा आहे. ही बाब सत्य आहे. अधिकारी सध्या कोळसा कंपनीच्या पिट्स वर बसून आहेत आणि निघणारा कोळसा लगेच वीज प्रकल्पामध्ये पाठवत आहेत. तरीपण अनेक प्रकल्पांमध्ये दीड आणि दोन दिवसांचा साठा आहे. मात्र हा प्रकार फक्त महाराष्ट्रातच नाही तर अनेक राज्यांत आहे. महावितरण सेवा देणारी कंपनी आहे. मात्र, ग्राहकांनी विजेचा वापर करताना बिल भरणेही आवश्यक आहे. हे ग्राहकांचाही कर्तव्य आहे. ग्राहकांनी वीज बिल भरलं तर महावितरणवर आर्थिक संकट ओढवणार नाही. आम्ही या संकटातून नक्कीच बाहेर पडू असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला.

उद्या तोडगा निघेल..

उद्या सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल आणि भारनियमनाची परिस्थिती राज्यावर येऊ देणार नाही, असे आश्वासन वीज संघटनांनी दिले आहे. ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसह राज्याच्या प्रधान सचिवांनीही वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत चर्चा केली आहे. काही प्रमाणात त्यांचे गैरसमज आहेत, मात्र उद्या चर्चेतून सर्व दूर होतील, असेही नितीन राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com