Nashik Graduate Election : पहिल्या फेरीत सत्यजीत तांबेंना मोठी आघाडी...

Satyajit Tambe, Shubhangi Patil News : नाशिक पदवीधर निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Satyajit Tambe, Shubhangi Patil News
Satyajit Tambe, Shubhangi Patil News

Nashik Graduate Election News : नाशिक पदवीधर निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ही मतमोजणी २ वाजता सुरु झाली आहे. नाशिकमधून पहिली अपडेट समोर आली आहे. त्यामध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगा पाटील (Shubhangi Patil) पीछाडीवर आहेत.

सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात पहिल्या फेरीच्या सुरुवातील अटीतटीची लढत दिसत होती. दोघांच्याही नावासमोर मतपत्रिकांचा जवळपास सम-समान गट्टे होते. मात्र, त्यानंतर तांबे यांनी आघाडी घेतली. तांबे यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरु केला आहे. सत्यजीत तांबे यांना 15 हजार 774 मतांची आघाडी असल्याची माहिती मिळत आहे. तसेच शुभांगी पाटील यांना 7 हजार 508 मते मिळाली आहे.

Satyajit Tambe, Shubhangi Patil News
Nashik Graduate Election Result : सत्यजीत तांबेंना थोरातांचा पाठिंबा? पोस्टरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

दरम्यान, विधान परिषजेच्या चार जागांवर सध्या मतमोजणी सुरु आहे. तर विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे दणदणीत विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

Satyajit Tambe, Shubhangi Patil News
Nashik Graduate Election Result: नाशिकमध्ये सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटलांमध्ये काटेकी टक्कर...

कोकणात पदवीधर मतदारसंघात एकूण ९१.०२ टक्के मतदान झाले होते. यात आता कोकणात भाजप (BJP) चे ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांना २० हजार ८०० मते मिळाली आहेत. तर बाळाराम पाटील यांना अवघ्या ९ हजार ५०० मतांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी गेल्या वेळेपेक्षा अधिक मतदान झाले होते. नाशिमध्ये यावेळी मतदानाचा टक्का घसरला होता. त्यामुळे नेमका घसरेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com