जो तरसते है, वो गरजते है और जो गरजते है, वो कभी बरसते नही…

त्यांची बेईमानी संपता संपत नाही. जेव्हा अशा बेईमानीचा पहाड तयार होतो, तेव्हा जनतेच्या शक्तीने तो भस्मसात होतो, असे आमदार मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) म्हणाले.
MLA Sudhir Mungantiwar
MLA Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : शिवसेनेतर्फे आज मुंबई विमानतळावर शक्तिप्रदर्शन केले जात आहे. न्याय मागायचा झाल्यास न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून तो घेतला पाहिजे. त्यासाठी आंदोलन करायची गरज नाही, असे सांगत जो तरसते है, वो गरजते है और जो गरजते है, वो कभी बरसते नही, असे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

चौकाचौकांत जनतेच्या समस्या घेऊन आंदोलने केली असती, तर त्या पक्षाचा जनाधार वाढला असता. शिवसेनेच्या (Shiv Sena) लोकांना विदर्भातील प्रश्न दिसले नाहीत. महाराष्ट्राच्या (Maharashtra) जनतेला हे सगळे प्रश्न माहीत आहेत. विदर्भातील (Vidarbha) जनतेने याची नोंद घ्यावी, ते ती घेतील आणि योग्य वेळी हिशोब करतील. बेईमानीच्या आधारावर जे सत्ताधारी झाले, त्यांची बेईमानी संपता संपत नाही. जेव्हा अशा बेईमानीचा पहाड तयार होतो, तेव्हा जनतेच्या शक्तीने तो भस्मसात होतो, असे आमदार मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) म्हणाले.

किरीट सोमय्यांना जोड्याने मारले पाहिजे, असे महाविकास आघाडीमधील नेते बोलत आहेत. याबाबत विचारले असता आमदार मुनगंटीवार म्हणाले, जो जसं म्हणतो, देव त्याला तशाच कृतीच्या माध्यमातून उत्तर देतो, अशी म्हण आपल्या विदर्भात आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. कोण देशप्रेमी, कोण देशभक्त, हे सांगण्यासाठी हे काही विद्यापीठ नाही. तर खरं काय आहे, हे लोक ठरवतात. कोण हिंदुत्ववादी, कोण हिंदुत्वाच्या विरोधात कृती करणारे, देशावर कोण प्रेम करतो, हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही आणि देवेंद्र फडणीस यांना सल्ला देण्याची आवश्यकता तर मुळीच नाही, असेही ते म्हणाले.

MLA Sudhir Mungantiwar
मुनगंटीवार म्हणाले, सत्ता मे जो आये है, जरा याद करो इनकी बेईमानी…

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी बॅक डोअर एंट्री घेतलेली नाही, तर मुख्य दारातून ते आलेले आहेत. जनतेच्या आशीर्वादाने ते निवडून आलेले आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीत एकदा नव्हे, तर चारवेळा निवडून आले आहेत. म्हणून देवेंद्र फडणीस यांना काय करायचं आहे, याचा मोफत सल्ला कुणा देण्याची गरज नाही, मानद डिलीट पदवी पूर्वी दिली जायची, तशीच आता मानद वकिलीची सनद देण्याची वेळ आली आहे, असे वाटत असल्याचेही आमदार मुनगंटीवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com