Tumsar  APMC
Tumsar APMCSarkarnama

Tumsar Apmc News : हुश्‍श... मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश धडकले!

Bhandara District : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा मार्ग झाला सुकर.
Published on

अभिजीत घोरमारे (AG88)

Tumsar Apmc News : तीन वेळा निवडणुका रद्द झालेल्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश अखेर भंडारा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. तीन महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश धडकल्याने तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग अखेर सुकर झाला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या घाई गडबडीत भंडारा जिल्हा प्रशासनाला आता तुमसर बाजार समितीच्या निवडणुकीची ओझेही वाहावे लागणार आहे. त्यामुळे आधीच इलेक्शन मोडवर असलेल्या भंडारा जिल्हा प्रशासनाला पुन्हा एका निवडणुकीच्या कामाला लागावे लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भंडारा जिल्हा प्रशासन ‘इलेक्शन मोड’वर आले आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांचे बैठक सत्र आता सुरू झाले आहे.

Tumsar  APMC
Bhandara Corruption News : भंडाऱ्यातील बंद पडलेल्या कंपनीतील कोट्यवधींचा भ्रष्टाचार पोहोचला मंत्रालयात !

लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत जिल्हा प्रशासन काम करत आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शुक्रवारी (ता. 9) एकाच दिवसात दहापेक्षा अधिक बैठका घेत आगामी निवडणुकीच्या कामाबाबत प्रशासन गंभीर असल्याचे दाखवून दिले. निवडणूक विषयातील प्रत्येक बाबीची तयारी सध्या सूक्ष्म पद्धतीने करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

दरम्यान भंडारा जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानली जाणारी व श्रीमंत समजली जाणारी तुमसर - मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तीन महिन्यांच्या कालावधीत घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला दिले आहेत. निकालाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आत, 2017 च्या नियमांच्या नियम 7 (5) नुसार नवनिर्वाचित सदस्य व सरपंचांच्या नावे 20 मार्च 2023 च्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा रिटर्निंग ऑफिसर यांना नवीन निवडणूक कार्यक्रम प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

2015मध्ये या बाजार समितीची निवडणूक झाली होती. दरम्यानच्या काळात न्यायालयाने बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती. पुढील आदेशापर्यंत पुन्हा तुमसर - मोहाडी बाजार समिती निवडणूक लांबणीवर गेली होती. आतापर्यंत तीन वेळा बाजार समिती निवडणूक रद्द झालेली आहे. मात्र, अखेर उच्च न्यायालयाचे आदेशच धडकल्याने सर्व "ऑल इज वेल" मानले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे लोकसभेच्या तोंडावर भंडाऱ्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या तुमसर बाजार समितीची निवडणूक लागल्याने आता भाजपपासून इतर सर्वच पक्षांनी या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. लोकसभेची निवडणूक संपताच सर्व पक्षांना पुन्हा एकदा बाजार समितीच्या निवडणुकीच्या कामाला लागावे लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात निवडणुकीचा फीवर पाच ते सात महिने अधिक पाहायला मिळणार आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com