Tumsar Election 2025: भाजप माजी आमदाराच्या पुतण्याची बंडखोरी; उमेदवारीवरुन मतभेद

BJP leader Ashish Kukde’s Rebellion: राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर अभिषेक कारेमोरे यांना तिकीट दिले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे. तुमसरचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोराला समर्थन जाहीर केले आहे.
 BJP politics
BJP politicsSarkarnama
Published on
Updated on

भंडारा : Tumsar Election 2025 :भंडारा जिल्हातील तुमसर नगर परिषदेची निवडणूक वेगवेगळ्या राजकीय घटना घडामोडीने गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिलेल्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बंडखोरी केली आहे. त्याला राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांची साथ लाभली आहे.

आता भाजपातही कुरबुरी सुरू झाल्या आहेत. भाजपचे माजी आमदार मधुकर कुकडे यांनी पैसे मागितल्याशिवाय तिकीट दिले जात नाही, असा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांच्या पुतण्याने भाजपच्या विरोधात येथे बंडखोरी केली आहे. येथे सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण झाली असल्याने धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तुमसर नगर परिषद भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाची नगर परिषद मानली जाते. भाजपचे माजी आमदार मधुकर कुकडे यांचा पुतण्या आशिष कुकडे महत्त्वाचे दावेदार होते. त्यांना भाजपने शब्दही दिला होता. मात्र कुकडे यांना तिकट नाकारण्यात आले. त्यामुळे आशिष कुकडे यांनी बंडखोरी केली आहे. भाजपने माजी महापौर प्रदीप पडोळे यांना तिकीट दिले आहे. कुकडे यांच्या बंडखोरीमुळे फारकाही फरक पडणार नाही आम्ही आरामात निवडून येऊ असा दावा प्रदीप पडोळे यांनी केला आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर अभिषेक कारेमोरे यांना तिकीट दिले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे. तुमसरचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोराला समर्थन जाहीर केले आहे. त्यांच्या रॅलीतही आमदार आणि त्यांच्या पत्नी उघडपणे सहभागी झाल्या होत्या. सागर गभणे हे त्यांचे उमेदवार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत.

 BJP politics
Talegaon Dabhade News: गड बिनविरोध! आता 'सिंहा' साठी झुंज; भेगडे -दाभाडेंचा कस लागणार

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रफुल पटेल यांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बंडखोरांनी माघार घ्यावी असे आवाहन केले होते. मात्र त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही. या उलट प्रफुल पटेल यांच्याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. तुमसर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून टोकाचे मतभेद निर्माण झाले असल्याचे यावरून दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com