Vidhan Sabha Election : राजुरा मतदारसंघासाठी भाजपच्या दोन नेत्यांची धावाधाव

Rajura Constituency : पक्षातील वरिष्ठांच्या निर्णयाकडे लागले सर्वांचे लक्ष
Rajura Vidhan Sabha.
Rajura Vidhan Sabha.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Politics : लोकसभा निवडणुकींनतर राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. मिशन लोकसभा राबवित राज्यातही आपलीच सत्ता यावी, यासाठी भाजपने कंबर कसली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभेच्या निवडणुकीत भाजप कोणाला आपला शिलेदार बनविणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपचे माजी आमदार संजय धोटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी विधानसभा मतदारसंघात तयारीला सुरुवात केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय आखाड्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. जिल्ह्यात तीन काँग्रेसचे आमदार आहेत. भाजपचे दोन तर एक अपक्ष आमदार असे पक्षीय बलाबल आहे. जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविण्यासाठी भाजपचे शिलेदार कामाला लागले आहेत.

Rajura Vidhan Sabha.
Chandrapur Yuvasena News : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या

राजुरा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. शेतकरी संघटनेचे आमदार वामनराव चटप यांनी पहिल्यांदा विजयश्री मिळवित काँग्रेसला धक्का दिला होता. चटपांनी तब्बल तीनदा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपने पहिल्यांदा या मतदारसंघात कमळ फुलविले. भाजपचे संजय धोटे यांनी काँग्रेसच्या सुभाष धोटे यांचा पराभव करीत विजय संपादित केला होता.

राजुरा मतदारसंघात पहिल्यांदाच पक्षाचा आमदार झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा दुणावला होता. 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत सुभाष धोटे यांनी पुन्हा विजय आपल्याकडे खेचून आणला. या निवडणुकीत भाजपचे संजय धोटे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. वामनराव चटप यांनी सुभाष धोटेंसमोर तगडे आव्हान उभे केले होते. परंतु त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी काळात पुन्हा निवडणुकीची धामधुम सुरू होणार आहे. या निवडणुकीसाठी नेत्यांनी आतापासूनच आपल्या कामांना सुरुवात केली आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात कोणत्याही स्थितीत कमळ फुलविण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरविले आहे. आता यासाठी माजी आमदार संजय धोटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यात कमालीची रस्सीखेच सुरू झाली आहे.

देवराव भोंगळे हे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुगगंटीवार यांचे नीकटवर्तीय मानले जातात. राजुरा विधानसभेतील प्रत्येक तालुक्यात भोंगळेंनी स्वतंत्र कार्यालय उभारली आहेत. या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दुसरीकडे संजय धोटे हे देखील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत. संजय धोटे यांनीच पहिल्यांदा राजुऱ्यात कमळ फुलविले होते. अशात दोघांनीही राजुरा विधानसभा मतदारसंघात शिलेदार होण्यासाठी आता कंबर कसली आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर सध्या भाजपत आहेत. त्यांनीही आपल्या समर्थकांना अलर्ट केले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Rajura Vidhan Sabha.
Akola Shiv Sena : रस्त्याच्या मागणीसाठी बांधकाम कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com