Uddhav Thackeray : 'भाजपला दाढीवाला डिंक्या आणि गुलाबी आळी लागली', उद्धव ठाकरेंनी तोफ डागली

Uddhav Thackeray Criticized BJP Eknath Shinde : देशात वन नेशन वन इलेक्शन आणायचे म्हणत आहेत. खरं तर मोदींचे वन नेशन वन काॅन्ट्रॅक्टर आणायचा आहे. सगळं एकालाच द्यायचे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News: नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपला धू धू धुतले. अजित पवारांवर देखील नाव न घेता ठाकरेंनी निशाणा साधला. पिकांवर ज्या प्रकारे रोग होतो, आळी लागते. त्याप्रमाणे भाजपच्या रोपट्याला दाढीवाला डिंक्या रोग आणि गुलाबी आळी लागली आहे.' असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

मोदी, शाह यांना महाराष्ट्र गिळायचा आहे. म्हणून ते मला, शरद पवारांना आडवा म्हणत आहेत, असा हल्ला देखील उद्धव ठाकरेंनी चढावला.

देशात वन नेशन वन इलेक्शन आणायचे म्हणत आहेत. खरं तर मोदींचे वन नेशन वन काॅन्ट्रॅक्टर आणायचा आहे. सगळं एकालाच द्यायचे आहे. मुंबईतील धारावी, विमानतळ अदानीला दिले आहे. आता इकडं चंद्रपुरातील शाळा देखील देऊन टाकतं आहेत. मी मुख्यमंत्री असताना एकतरी उद्योग गुजरातला गेला का? असा सवाल देखील ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray
Ajit Pawar : अजितदादांच्या राष्ट्रवादीत चाललंय काय? चिंचवडला चार दिवसांत दोन गटांची बंडाळी

लाडक्या बहिणीचे 1500 रुपये देत आहेत. असे 1500 रुपयांत काय होते? महिलेच्या मुलाचे शाळेत अडमिशन तरी होते का? पण मोठ मोठाले कार्यक्रम घेत आहेत. लाडक्या बहीणचे पैसे काय तुमच्या खिशातील देताय काय? जनतेचे पैसे आहेत ते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी मुख्यमंत्री असताना कर्ज माफी केली पण स्टेज टाकून कार्यक्रम घेतले नाहीत. हे कार्यक्रम घेतायेत. महाराष्ट्राची लूट थांबवायची आहे म्हणून पुन्हा आपल्याला सत्तेत यायचे आहे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Praveen Darekar News : 'जागा वाटप, नेतृत्वावरून महाविकास आघाडीत..' ; प्रवीण दरेकरांचे विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com