Protest of Thackeray Group : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन, यवतमाळात ठाकरे गटानं पेटवलं रण

Damage to Crops : राज्य महामार्गाच्या दूरवस्थेमुळं पिकं काळवंडली
Rasta Roko in Yavatmal
Rasta Roko in YavatmalSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal Political News : शेतकऱ्यांच्या हितासाठी यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटा चांगलाच आक्रमक झालेला बघायला मिळतोय. रस्त्यांच्या दूरवस्थेमुळं महामार्गांना लागुन असलेल्या शेतांमधील पिकं काळवंडत असल्याचा आरोप करीत ठाकरे गटानं यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. सुमारे पाच तासापर्यंत रास्ता रोको आंदोलन करीत ठाकरे गटानं जिल्हा दणाणुन सोडला.

वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सोबत घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटानं जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात ठिकठीकाणी रास्ता रोको आंदोलन केल्यानं प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. (Uddhav Thackeray group's road block movement in Yavatmal district for the demand of farmers)

वणी-ढाकोरी राज्यमार्ग क्रमांक ३७४ची दयनीय अवस्था झालीय. त्यामुळं रस्त्यालगतच्या शेतातील पीकं धुळीने काळवंडली आहे. पीकं काळवंडल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतय. शेतांमध्ये धुळीचे थर साचले आहेत. या महामार्गावरून येणे-जाणे करणाऱ्या नागरीकांना मनस्ताप तर सहन करावा लागतोच शिवाय या भागातील धुळीच्या प्रदूषणातही त्यामुळं वाढ झाली आहे. मात्र बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन याकडं दुर्लक्ष करतेय.

धुळीमुळं नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी आदी मागण्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटानं शेतकऱ्यांसह आंदोलन केलं. शेतकरी यासंदर्भात प्रशासनाचं वारंवार लक्ष वेधत आहे. पत्रव्यवहार, निवेदनं देऊन झालीय. परंतु अधिकारी कोणतीही कार्यवाही करीत नसल्यानं शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रस्त्याच्या दुरूस्तीसह कापसाला १० हजार रुपये व सोयाबीनला सात हजार भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना सलग आठ तास वीज पुरवठा करण्यात यावा, अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ मिळावे, केंद्र सरकारनं आकारलेला आयातकर रद्द करावा, कंपनीत काम करणाऱ्या मजुरांचे स्थलांतर प्रमाणपत्राची तपासणी करावी, यवतमाळ रोडलगतचे कोलडेपो हटविण्यात यावे या मागण्यांकडे आंदोलनकर्त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं.

शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात चारगांव चौकी, आबई फाटा, ढाकोरी येथे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाहतूक रोकली. या आंदोलनामध्ये तालुका शिवसेना प्रमुख प्रसाद ठाकरे, उपशहर प्रमुख महेश चौधरी, गणपत लेडांगे, मोरोपंत पोतराजे, विशाल आवारी, विजय झाडे, संभा मत्ते, महिला संघटक सीमा आवारी, सरपंच गीता उपरे, सविता आवारी, स्वाती झाडे, स्वाती राजुरकर आदी सहभागी झाले होते.

आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक संजय राठोड यांनी अतिरिक्त ताफ्यासह वणी-ढाकोरी राज्यमार्ग गाठला. पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या वाहनांना पर्यायी मार्गानं मार्गस्थ केलं. त्यानंतर त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. सुमारे पाच तासांपर्यंत हे आंदोलन सुरू होतं. त्यामुळे वणी-ढाकोरी राज्यमार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ पूर्ण करण्यात याव्यात अशी आंदोलकांची मागणी होती. अखेर यासंदर्भात अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं.

Edited By : Prasannaa Jakate

Rasta Roko in Yavatmal
Yavatmal People got Angry : पोलिसांनी कामाला लागावं , आमच्या पालकमंत्र्यांना शोधून काढावं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com