

Uddhav Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले. या खासदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. खासदार संजय देशमुख यांचा मतदारसंघ वाशिम-यवमाळच्या दौऱ्यावर ठाकरे आहेत. या दौऱ्यात त्यांनी देशमुखांवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, 'काही वेळेला माझी चूक होते आणि म्हणून पहिल्या प्रथम माझं कर्तव्य आहे की माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला मी एक बुजगावणं दिलं होतं, त्याला अक्षरशः रक्ताचं पाणी करून समोरून पावसाचा धबधबा पडत होता, तरी देखील कशाची तमा न बाळकता तुम्ही निवडून दिलात. त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची तर माफी मागतोच, पण तमाम या यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माफी मागतो की तुम्ही केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द या भरोशावरती या गद्दाराला निवडून दिला होता.'
'आपण त्याला मतदान करताना बोटाला काळी शाई लावलीच, पण त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळं फासलेलं आहे आणि याचा जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे, जाब विचारला पाहिजे. शेवटी गद्दारच गद्दारांच्या कळपात गेला.', असे ठाकरे म्हणाले.
'म्हणजे हा एक धंदा झालाय. निवडून यायचं...आपला हमीभाव वाढवायचा आणि विकून टाकायचं सगळं. मी मुद्दामून एक क्लिप ऐकणार, दाखवणार आहे तुम्हाला की शेवटी फसगत कशी होते, हे कळेल', असे म्हणत ठाकरेंनी संजय देशमुखांची क्लिप ऐकवली.
उद्धव ठाकरेंनी ऐकवलेल्या क्लिपमध्ये संजय देशमुख म्हणत आहेत की, ' हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य मला आजही आठवते की मी वयाच्या १५ व्या वर्षी शिवसैनिक झालो. जेव्हा कोणी संकटात असेल, तेव्हा जात-पात, धर्म न पाहता त्याच्यासाठी आपण धावून गेलं पाहिजे. आज शिवसेना संकटात होती, माझी आई ८३ वर्षांची होती, तिने सुद्धा सांगितलं की शिवसेनेला सहकार्य करायचं. म्हणून मी ठाकरेंसोबत आहे.'
क्लिप ऐकवल्यानंतर उद्धव ठाकरे म्हमाले, 'आईची शपथ घेऊन जर कोणी गद्दारी करणार असेल, तर खरोखर आईला काय वाटत असेल? आणि आपल्या सगळ्यांची फसगत झाली. आईची शपथ घेतल्यानंतर यांनी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले आणि परत आल्यानंतर तुम्ही आता टेपमध्ये ऐकलं असेल की काय म्हणाले ते.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.