Shivsena UBT and Congress Politics : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने दिला धक्का; प्रदेश प्रवक्ताच लावला गळाला!

Shiv Sena Spokesperson Kishore Kanhere Joins Congress : प्रदेश प्रवक्ते आणि समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तसेच विदर्भातील नेते किशोर कान्हरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे.
Kishore Kanhare
Kishore KanhareSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi: विदर्भातील जागांवरून सध्या उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. काँग्रेसने नागपूर जिल्ह्यात एकही जागा सोडणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आघाडीत तणाव निर्माण झाला आहे.

हा वाद सध्या दिल्लीत पोहचला असताना काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते आणि समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तसेच विदर्भातील नेते किशोर कान्हरे यांनाच आपल्या गळाला लावले आहे.

कान्हेरे यांचा आज(रविवारी) दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge), महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी रमेश चेंनिथाला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.

विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर ही पळवापळवी झाल्याने आघाडीत आणखी वादाची ठिणगी पडणार असल्याचे दिसून येते. आता काँग्रेस कान्हेरे यांच्यावर काय जबाबदारी सोपवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Kishore Kanhare
Nagpur BJP News : नागपूरमध्ये 'या' एकमेव आमदाराला भाजपने ठेवले होल्डवर!

किशोर कान्हेरे यांचं राजकीय वाटचाल शिवसेनेतून(Shivsena) सुरू झाली. छगन भुजबळ यांनी शिवसेनेला रामराम केला तेव्हा कान्हेरे हे त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेले होते. भुजबळ यांनी समता परिषदेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती.

मध्यंतरी त्यांनी भुजबळ यांची साथ सोडली. ते पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत सहभागी झाले. मात्र माळी समाजाला शिवसेना राजकीय प्रतिनिधित्व देत नसल्याचे म्हणत ते नाराज होते. हे बघून आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. काँग्रेसने विधानसभेत ओबीसी आणि सर्वच प्रमुख समाजाला विधान सभेच्या निवडणुकीत प्रतिनिधित्व देण्याचे कान्हेरे यांना आश्वासन दिले असल्याचे समजते.

Kishore Kanhare
Shivsena UBT and Congress : '..तर आम्ही काँग्रेसचे उमेदवार पाडू' ; नागपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा!

याशिवाय आज समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीत प्रवेश केला.

यावेळेस महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com