Yavatmal News : मराठा आंदोलनादरम्यान बस जाळणाऱ्या तिघांना हदगावातून अटक

Police Action : घटनेच्या 28 दिवसांनंतर उमरखेड पोलिसांची मराठवाड्यात कारवाई
Umerkhed Police Yavatmal & Burnt Bus.
Umerkhed Police Yavatmal & Burnt Bus.Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षण मिळावे यासाठी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू असतानाच्या काळात यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीच्या पुलावर मधोमध एसटी महामंडळाची बस जाळण्यात आली होती. याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात असलेल्या हदगाव येथुन तीन जणांना अटक केली आहे. जाळपोळ करणाऱ्यांचा खरोखर मराठा आंदोलनाशी काही संबंध होता, की त्यांनी अन्य कोणत्या कारणामुळं हा प्रकार केला हे अद्याप अस्पष्ट आहे. आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रकरणाचा तपास अद्यापही सुरूच आहे. त्यामुळं ठामपणे काही सांगता येणार नाही, असं पोलिस उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांनी सांगितलं

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे दुसऱ्यांदा बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक पडसाद उमटले. अशातच 28 ऑक्टोबरला यवतमाळ जिल्ह्यातही बस जाळण्यात आली होती. (Umarkhed Police Of Yavatmal Arrests Three From Hadgaon Of Marathwada For Setting Fire To MSRTC Bus During Maratha Reservation)

Umerkhed Police Yavatmal & Burnt Bus.
Protest : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर एसटी महामंडळाची बस जाळली

पोलिसांनी याप्रकरणी आकाश हुलकाने (वय 23), शिवराज कदम (वय 25), चेतन राठोड (वय 25) यांना अटक केली आहे. तिघेही मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात असलेल्या हदगावचे रहिवासी आहेत. नांदेड येथुन नागपूरच्या दिशेने मार्गस्थ असलेली एसटी महामंडळाची बस (क्रमांक : एमएच 20-जीसी 3189) उमरेड तालुक्यातील गोजेगावजवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर मधोमध अडविण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या काही तरुणांनी बसची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी पेट्रोल टाकत बस पेटवली. यावेळी बसमधुन 73 जण प्रवास करीत होते. रात्री 11 वाजता ही घटना घडली होती.

बस जाळल्याप्रकरणी चालक बी. डी. नाईकवाडे यांनी उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेमुळे एसटी महामंडळाचं 32 लाखांचं नुकसान झालं. घटनेच्या दिवसापासून उमरखेड पोलिस जाळपोळ करणाऱ्यांच्या शोधात होते. उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ, उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार यांनी खबऱ्यांना कामाला लावले. पोलिसांचं पथकही याप्रकरणाचा तपास करीत माहिती काढत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तब्बल 28 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना याप्रकरणील धागेदोरे सापडले. पोलिसांनी यासाठी ‘रिव्हर्स इन्व्हेस्टिगेशन’ पद्धत वापरली. बस जाळणारे पुन्हा नांदेडच्या दिशेनं पाळल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं होतं. त्यामुळं चालक, वाहकानं दिलेली माहिती, तरुणांचं वर्णन, दुचाकींबद्दलची माहिती एकत्र करण्यात आली. पोलिसांनी बस ज्या ज्या मार्गावरून आली त्या मार्गावर तपास केला. वाटेतील ढाबा, हॉटेल, रेस्टॉरंट, चहाच्या टपऱ्या, पानठेले, पेट्रोल पम्प येथे चौकशी करण्यात आली. अशा ठिकाणी कुणी बस जाळणे वैगरे सारखं बोललं होतं काय, याची माहिती घेण्यात आली. त्यातून पोलिसांना आरोपी गवसले. आरोपी गवसल्यानंतरही पोलिसांनी घाई केली नाही. सर्व पद्धतीनं खात्री पटल्यानंतरच तीन जणांना अटक करण्यात आली. तीनही आरोपींना पोलिसांनी कोर्टापुढं हजर केलं. कोर्टानं त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय.

Edited by : Prasannaa Jakate

Umerkhed Police Yavatmal & Burnt Bus.
Yavatmal OBC : शासनाच्या दुर्लक्षामुळं यवतमाळात ओबीसी उतरले रस्त्यावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com