G Kishan Reddy on Congress : ''...यावरून काँग्रेसच्या अधःपतनाची सुरुवात झाल्याचे दिसून येते'' ; केंद्रीयमंत्र्यांचं मोठं विधान!

Congress Party Decline : ''सलग पराभवांमुळे काँग्रेसचे सर्वोच्च नेतेच नैराश्यात अन् पक्षाचे भवितव्य अंधारात'' असल्याचा टोलाही केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी यांनी लगावला आहे.
G Kishan Reddy on Congress
G Kishan Reddy on CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress Losing Support : ''महाराष्ट्राच्या पाठोपाठ दिल्लीतही काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. ईव्हीएमवर खापर फोडून आपल्या पराभवास निवडणूक आयोगाला जबाबदार धरत आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पाठोपाठ होत असलेल्या पराभवामुळे नैराश्यात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बेताल वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही.'' असे सांगून केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी काँग्रेसचे अध:पतन सुरू झाले असल्याची टीका केली.

महाराष्ट्रातील पराभवामुळे काँग्रेसला सर्वाधिक धक्का बसला आहे. लोकसभेस यश मिळाल्यानंतर पाच महिन्यातच पक्षाची पडझड झाली. भाजपने(BJP) निवडणूक आयोगाला मॅनेज केले असल्याचा आरोप काँग्रेसचा आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेतही पाच महिन्यात ३४ लाख मते वाढली कशी आणि ती संपूर्ण महायुतीच्या उमेदवारांनाच कशी मिळाली असा सवाल उपस्थित केला आहे. तर वाढीव मतांचा शोध घेण्यासाठी काँग्रेसने ईगल समितीची स्थापना केली आहे. निवडणूक आयोगालाच्या विरोधात न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे.

G Kishan Reddy on Congress
President Rule in Manipur : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू! , मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दिला होता राजीनामा

याबाबत विचारणा केली असता जी. किशन रेड्डी(G Kishan Reddy) म्हणाले, काँग्रेसचे आरोप गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांना पराभवाचे खापर कोणावर तरी फोडायचे होते. त्यामुळे निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात आहे. जाणीवपूर्वक निवडणूक आयोग आणि ईव्हीएमला दोष देत आहेत. यावरून काँग्रेसच्या अधःपतनाची सुरुवात झाली असल्याचे दिसून येते. सर्वोच्च नेतेच नैराश्यात गेले असल्याने काँग्रेसचे भवितव्य दिसत नसल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली.

भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय खदान कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी ते नागपूरला आले होते. यावेळी रेड्डी म्हणाले, भारताची वीजेची मागणी झपाट्याने वाढत असून उन्हाळ्यात लोकांना वीज टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकारने यावर्षी एक अब्ज टन कोळशाच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. देशातील ७४ टक्क्यांहून अधिक वीजनिर्मिती कोळशावर आधारित आहे. या पार्श्वभूमीवर सरकार वीजेची कमतरता भासू नये यासाठी काम करत आहे.

G Kishan Reddy on Congress
BJP Delhi Woman CM Face : 27 वर्षांनंतर सत्तेत आलेली BJP महिला आमदारास का बनवू शकते दिल्लीच्या मुख्यमंत्री?

गेल्या वर्षीच्या तुलनेत कोळसा उत्पादन वाढले आहे. लिथियम आणि तांबे यांसारख्या क्रिटिकल मिनरल्सची मागणी वाढत आहे. अशात क्रिटिकल मिनरल्ससाठी अर्जेंटिना येथे भारत ब्लॉक घेण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती कोळसा मंत्री किशन रेड्डी यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com