Nitin Gadkari : "मी 'फोकनाड' नेता नाही, जे बोलतो ते करूनच दाखवतो!", गडकरींनी भर सभेत नेमकं कुणाला सुनावलं? वाचा सविस्तर

Nitin Gadkari viral statement news : ‘मी फोकनाड नेता नाही’ असं म्हणत नितीन गडकरींनी भर सभेत जोरदार वक्तव्य केलं. नेमकं कुणाला उद्देशून हे बोलणं होतं? वाचा सविस्तर.
nitin gadkari
nitin gadkariSarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणा नेहमीच बुचकाळ्यात टाकणाऱ्या असतात. हे कस काय शक्य अशी विचारणा करून अनेकजण आश्चर्यसुद्धा व्यक्त करतात. विरोधक त्यांची नेहमीच खिल्ली उडवत असतात. अशीच एक घोषणा त्यांनी दहा वर्षांपूर्वी केली होती. ते म्हणाले होते नागपूरच्या नागनदीतून एक दिवस बोट चालवून दाखवील.

मात्र अद्याप ही नदी शुद्ध झाली नाही. शहरातील मल व घाण पाणी या नदीतून वर्षभर वाहत असते. मात्र आज पुन्हा गडकरी यांनी हीच घोषणा केली. ते म्हणाले मी फोकनाड मारणारा नेता नाही. मी नागनदीतू बोट चालवूनच दाखवील. त्यात बसून मी अंबाझरी ते अंभोरा असा प्रवास करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करतो तेच बोलतो अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

nitin gadkari
TET परीक्षेच्या टेन्शनमधून आता सुटका? केंद्र सरकारच्या 'या' निर्णयाने होणार लाखो शिक्षकांच्या आशा पल्लवित

महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गडकरी आजपासून पुन्हा मैदानात उतरले आहे. सकाळी त्यांनी संवाद बैठका घेतल्या. रात्री तीन जाहीर सभा घेतल्या. या सभेत बोलताना त्यांनी नागपूरमध्ये काय काय केले याची माहिती दिली. ते म्हणाले मी जे बोलतो ते करून दाखवतो. जे केले तेच बोलतो. नागपूरमध्ये एका पिलरवर तीन तीन मजल्याचा उड्डाणपूल उभारून दाखवला. हा देशातील एकमेव असा पुल आहे. आता पुण्यात हा प्रयोग केला जाणार आहे. तेथे एका पिलरवर चार मजली पूल उभारले जाणार आहे. नागपूर शहराला चोवीस बाय सेव्हन पाणी पुरवठ्याची घोषणासुद्धा गडकरी यांनीच केली होती.

कुठल्या भागात चोवीस तास पाण्याचा पुरवठा होतो हे कोणी अद्याप दाव्याने सांगू शकत नाही. मात्र गडकरी आपल्या दाव्यावर ठाम आहेत. पूर्व नागपूरमधील सभेत मात्र एका महिलेने माझ्या घरी चोवीस तास पाणी येते असे सांगून त्यांचा दाव्याला दुजोरा दिला.

काँग्रेसने काय केले? अशी विचारणा करून ते म्हणाले, काहीच मिळाले नाही तर त्यांनी प्राथमिक शाळा घेतल्या, शिक्षकाचा पगार अर्धा तुम्ही अर्धा आम्ही, गावोगावी रोजगाराची हमी ही योजना राबवली.

nitin gadkari
AAP Kolhapur candidates : 'मी निवडून आल्यानंतर टक्केवारी घेणार नाही, दुसऱ्या पक्षात जाणार नाही...'; 500 रुपयांच्या स्टॅम्पवर 'या' उमेदवारांकडून मतदारांना लेखी हमी!

नेत्यांच्या मुलाला,ड्रायव्हरला, नातेवाइकाला तिकीट दिले. त्यामुळे काँग्रेस बुडाली आहे. राजकारणात असे चालत नाही. मात्र जनतेची मागणी असेल आणि त्याची क्षमता असेल तर त्याला तिकीट द्यायला हरकत नाही. नगरसेवकाचा पोरगा नगरसेवक होणार नाही तर तो जनतेच्या सेवेतून व्हावा असे ते म्हणाले. ही सर्व विकास कामे होऊ शकली याचे श्रेय गोरगरीब जनतेचे आहे. तुम्ही आम्हाला समर्थन दिले नसते, आशीर्वाद दिले नसते तर हे होऊच शकले नाही. विकासासाठी ‘सौ बिमारी का एकही इलाज है' कमळाचे बटन दाबा. याची गॅरंटी मी घेतो असेही नितीन गडकरी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com