Ramdas Athvale News : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची शेरोशायरीतून जोरदार फटकेबाजी

Political News : चंद्रपूरमध्ये आयोजित महायुतीच्या सभेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शेरोशायरीतून फटकेबाजी करीत सभेला उपस्थित असलेल्यांची मने जिंकली.
Ramdas Athawale
Ramdas Athawalesarkarnama

Chandrapur News : चंद्रपूरमध्ये आयोजित महायुतीच्या सभेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शेरोशायरीतून फटकेबाजी केली. नरेंद्र मोदींचे नेतृत्व विकासाच्या दिशेने पुढे जाणारे आहे. ज्यावेळेला मी येतो चंद्रपूरमध्ये, त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येते सफल झालेलं चंद्रयान, साऱ्या जगाचं असते भारताकडे ध्यान. या देशाची 140 कोटी जनता आहे नरेंद्र मोदींची फॅन, या निवडणुकीत लावणार आहोत आम्ही इंडिया आघाडीवर बॅन', अशी शेरोशायरी रामदास आठवलेंनी करीत यावेळी उपस्थितांची मने जिंकली.

चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungnativar), त्याचबरोबर गडचिरोली-चिमूरचे भाजपचे उमेदवार अशोक नेते (Ashok Nete), या दोन्ही नेत्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत, असे रामदास आठवले म्हणाले. यावेळी आठवले यांनी “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे कधीच राहिले नाहीत कुणाचे मिंधे ते एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे धाडसी माणूस, चाळीस प्लस 10 आमदारांना घेऊन, अशी शेरोशायरी रामदास आठवले यांनी केली. (Ramdas Athvale News)

Ramdas Athawale
Ajit Pawar News : अजितदादा बारणेंच्या प्रचाराला आले, आता पार्थ पवार येणार का?

“या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी माझा रिपब्लिकन पक्ष तुमच्यासोबत आहे. बाबासाहेबांची जनता तुमच्याबरोबर आहे. या देशाचं संविधान कुणीच बदलणार नाही. जाणीवपूर्वक संविधान बदलणार अशी अफवा पसरवली जात आहे. पण मी तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदी संविधान मजबूत करणार नेते आहेत. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन रामदास आठवलेंनी केले.

महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मजबूत करण्यात देवेंद्र फडणवीस यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील महायुती मजबूत करण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा फारच मोठा आहे वाटा, कारण त्यांनी काढलेला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काटा, अशी फटकेबाजी रामदास आठवलेंनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आम्ही 400 पारचा नारा दिला आहे, 400 पार, आम्ही करणार आहोत 400 पार, मग का होणार नाही काँग्रेसचे हाल? काँग्रेस भ्रष्ट राजकारण करुन सत्तेवर राहिले, या देशाला धुळीला मिळवण्याचं काम केले आहे', अशी टीका, रामदास आठवले यांनी केली.

Ramdas Athawale
Lok Sabha Election 2024 News : आता आठवलेही आक्रमक; शिर्डी द्या, अन्यथा...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com