Mohan Bhagwat On Reservation : ''... तोपर्यंत आरक्षण राहील आणि संघ याचं समर्थन करतो! ''; सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान

RSS News : '' हायर सर्व्हिसेसमध्ये छुपा जातीभेद...''
RSS Chief Mohan Bhagwat news in Marathi,
RSS Chief Mohan Bhagwat news in Marathi, Sarkarnama

Nagpur : जालन्यातील आंदोलनानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून आरक्षणाचा मुद्दा एकदा तापला आहे. मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण आणि पोलिसांचा लाठीचार्ज यामुळे राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ढवळून निघालं आहे. सत्ताधारी - विरोधकांकडून आरोप - प्रत्यारोपांनी राळ उठवली जात आहे. एकीकडे आरक्षणावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी मोठं विधान केलं आहे.

सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी एका कार्यक्रमात आरक्षणावर भूमिका मांडली. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला असतानाच त्यांचं विधान महत्त्वाचं मानलं आहे. ते म्हणाले, आपल्या देशात आरक्षण दिलंय. कारण देशात सामाजिक विषमतेचा इतिहास राहिलाय. सामाजिक विषमतेनं आपण 2 हजार वर्षे विषमता ठेवली. त्यांना आपल्या बरोबरीने आणेपर्यंत आरक्षण राहणार आहे असेही ते म्हणाले.

RSS Chief Mohan Bhagwat news in Marathi,
Eknath Shinde News : '' आठ महिने मुख्यमंत्री कार्यालयातला 'डमी ओसडी' कळत नसेल, तर..'' ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला

परिवारात जो आजारी आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष ठेवतो. जोपर्यंत भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS) याचं समर्थन करतो. भेदभाव दिसत नाही, पण भेदभाव आजही आहे असेही भागवतांनी सांगितले.

भागवत म्हणाले, आरक्षणाची आम्हाला गरज नाही असे म्हणणारे लोकं पुढे येत आहे. आम्ही भेदभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यांनी 2000 वर्षे जातीवाद, भेदभाव सहन केला. आपण 200 वर्षे सहन केला तर काय फरक पडतोय असं मोहन भागवत यावेळी म्हणाले. हायर सर्व्हिसेसमध्ये छुपा जातीभेद आहे. मंदिरात प्रवेश मिळत नाही. हे आजही आहे. त्यामुळे समानता येईपर्यंत आरक्षणाची गरज आहे असेही भागवत यांनी स्पष्ट केलं.

RSS Chief Mohan Bhagwat news in Marathi,
Rohit Pawar Vs Sujay Vikhe : नगरमध्ये 'एमआयडीसी'वरून रणकंदन ? सुजय विखे - रोहित पवारांना वेगवेगळा न्याय

मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

सरकार दरबारी मराठा आरक्षणा(Maratha Reservation) संदर्भात घडामोडींनी वेग घेतला आहे. याचवेळी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांच्याकडे निजामकालीन नोंदी आहेत, त्यांना कुणबी दाखला मिळणार असल्याची घोषणा केली आहे.

ज्यांच्याकडे महसुली, शैक्षणिक आणि निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार आहे. त्यासाठी जे काही कागदपत्रे लागतील त्याची पडताळणी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात पाच सदस्य असतील असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com